Header AD

तुंबलेली मुंबई करायचे काय?

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

दहिसर, मिठी, ओशिवरा आणि पोयसर अशा चार नद्या मुंबईत आहेत. शिवाय तानसा, वैतरणा, उल्हास या नद्या मुंबईच्या जवळून वाहतात. मुंबईतील नद्यांचा विचार केला असता, या नद्यांचे नाल्यांमध्ये रुपांतर झाल्याचं दिसतं. मुंबईतील नद्यांचं मॅपिंग करणं आवश्यक आहे. हे मॅपिंग केल्यानंतर नव्यानं ड्रेनेज यंत्रणा तयार करावी लागेल. मुंबई महापालिकेने जाणकारांच्या मदतीने तयार कलेल्या ‘ब्रिमस्टोवॅड’ योजनेतही नद्यांसंदर्भात महत्त्वाची शिफारस करण्यात आली होती. पावसाचं पाणी सहज वाहून जावं यासाठी नद्या आणि नाल्यांची पात्रं रुंद आणि खोल करावी, नद्या-नाल्यांच्या काठावर संरक्षक भिंत उभारावी, अशी शिफारस ‘ब्रिमस्टोवॅड’ योजनेत करण्यात 
आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत नालेसफाईचा मुद्दा नेहमीच आ वासून उभा असतो. मुंबईतील नाल्यांची सफाई तुलनेने लवकर व्हायला हवी. शिवाय, नालेसफाई केल्यानंतर गाळ काठावरच ठेवला जातो. या गाळाची योग्य विल्हेवाट लावणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नाले तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. मुंबईतील जे नॅचरल ड्रेनेज आहेत, त्यांच्याशी छेडाछाड करण्यात आली आहे. शिवाय, इमारती किंवा इतर बांधकामांचे अतिक्रमण करून त्यांना संकुचित करण्यात आलं आहे. या नॅचरल ड्रेनेजशी छेडछाड करणं सर्वांत आधी थांबवलं पाहिजे. मुंबईतील हिंदमाता, मिलन सबवे, दादर, माहीम इत्यादी काही ठिकाणी दरवर्षी पाणी तुंबतं. तसंच, दरवर्षी पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसतं. मुंबईच्या सखल भागात पाणी साचतं. त्यामुळे मूळ नकाशाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हे केल्यास कुठल्या भागात पाणी साचण्याची जास्त शक्यता आहे, हे कळण्यास मदत होईल. 


तुंबलेली मुंबई करायचे काय?

मुंबईसारख्या शहराला नियोजनाच्या दृष्टीने व्हिजनची आवश्यकता आहे. मात्र, त्याची मोठी कमतरता जाणवते. मात्र, हे व्हिजन केवळ प्रशासन किंवा सरकारचं असून चालणार नाही, तर नागरिकांमध्येही असायला हवं, आपण ज्या शहरात राहतो, त्या शहराबद्दल एक आपुलकीची भावना असते, ती इथल्या उद्योगपती, राजकीय नेते आणि लोकांमध्ये तुलनेने कमी जाणवते. सगळ्यांनीच जबाबदारीने शहराच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, तर नक्कीच 
फरक पडू शकतो. मुंबई शहराच्या विविध गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. या सर्व यंत्रणांचा कमी-अधिक प्रमाणात शहराच्या व्यवस्थापनाशी संबंध येत असतो. या सर्व यंत्रणांमधील समन्वय कायमच वादाच्या भोवर्‍यात राहिला आहे. मिठी नदीच्या स्वच्छतेवरून एमएमआरडीए आणि मुंबई महापालिका यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे. प्रशासन हताश आहे कारण निर्णय प्रक्रिया त्यांच्या हातात नाही. ज्यांच्या हातात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यांच्याकडे दृष्टीकोन नाही आणि ज्यांच्याकडे दृष्टीकोन आहे त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. 

मुंबईचा काँक्रिटीकरणरुपी विकास थांबवायला हवा. मेट्रो प्रकल्प आणि त्यातही ‘मेट्रो-3’ हा भुयारी रेल्वे प्रकल्प आणि ‘सागरी रस्ता’ हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज आहे.1985 सालीही मुंबईत प्रचंड प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यानंतर नव्वदच्या दशकात मुंबई महापालिकेने शहर नियोजनासंदर्भात अभ्यासासाठी जाणकरांना एकत्र करुन योजना आखली. बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (इठखचडढजथ-ऊ) असं त्या योजनेचं नाव. या जाणकारांनी 1993 साली अहवाल सादर केला होता. या अहवालात मुंबईच्या नियोजनसंदर्भातील अत्यंत मुलभूत आणि महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या होत्या. पावसाचं पाणी सहज वाहून जावं यासाठी नद्या आणि नाल्यांची पात्रं रुंद आणि खोल करावी नद्या-नाल्यांच्या काठावर संरक्षक भिंत उभाराव्यात भूमिगत गटारांचं जाळ अधिक बळकट करावं. ज्या सखल भागात पाणी साचतं अशा आठ ठिकाणी पंपिंग व्यवस्था सुरु करावी. ‘ब्रिमस्टोवॅड’ योजनेला सुद्धा शासन-प्रशासनाकडून गांभिर्याने घेतलं जात नाही. मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून काही सुधारणा आवश्यक आहेत. 26 जुलै 2005 साली मुंबईत पूर आल्यानंतर मोठी जीवितहानी झाली होती. यानंतर पर्यावरण तज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षेत समिती स्थापन केली. या समितीने 2006 साली अहवाल सादर करुन काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. 2006 साली सादर करण्यात आलेल्या अहवालातून मिठी नदीच्या 200 मीटरच्या पट्ट्यात काय उपाययोजना करायला हव्यात, याचा आराखडा तयार करण्यात आला होता. पण नेहमी प्रमाणे हे सारे अहवाल, सारख्या उपाययोजना, शिफारशी नेहमीप्रमाणे धुळ खात पडल्या आहेत. नेहमीची येतो पावसाळा आणि त्याबरोबर मुंबई तुंबण्याचे दुख पचवायला शिकायला हवे?
तुंबलेली मुंबई करायचे काय? तुंबलेली मुंबई करायचे काय? Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर

  ■वर्षभरापासून बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होतोय   खंडित.... कल्याण , कुणाल  म्हात्रे :   महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबा...

Post AD

home ads