गेम निर्मितीकरता केओडीए
न्यूज१ मराठी । नेटवर्क
केओडीए विद्यार्थ्यांना गेम डिझाइनिंगच्या माध्यमातून ही कौशल्ये शिकण्यास मदत करते. या मंचावर 12+ प्रोग्रामिंग संकल्पना आणि 40+ शिक्षणाचे मॉड्यूल्स समाविष्ट आहेत जे विद्यार्थ्यांना व्यग्र ठेवण्यासाठी मजेदार पद्धतीने डिझाइन केले आहेत. मॉड्यूल्स प्रोग्रामिंग आणि एसटीइएम संकल्पना अंतर्भूत करतात. केओडीए 80 पेक्षा जास्त क्रियाकलाप, 50+ आव्हाने आणि प्रश्नोत्तरे तसेच इतर प्रोग्रामिंग कार्यांसह गणित आणि विज्ञानात चांगली कामगिरी करण्यास मदत करते. क्रियाकलाप आणि आव्हानांची रचना केवळ त्यांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठीच नव्हे तर संकल्पनांचा वापर बळकट करण्यासाठी केलेली आहे.
‘नेक्स्ट एज्युकेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक ब्यास देव रल्हन म्हणाले, तंत्रज्ञान, गॅजेट्स आणि गीझ्मोसच्या मोहामुळे लहान वयातच मुलांमध्ये एसटीइएम क्षेत्रात स्वारस्य विकसित होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु तंत्रज्ञानाचा वापर करणारी मुले मोठी झाल्यावर इनोव्हेटर होतातच असे नाही. आणि जरी असे घडलेच, तरी ही प्रक्रिया खूप धीमी असते. पुढील पिढीतील कोडर्सना प्रेरित करण्यासाठी केओडीए नवीन तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आले आहे, अशाप्रकारे नवीन अनुभव मिळवण्याकडे त्यांचा अधिक कल असेल हे सुनिश्चित करते.
गेम निर्मितीकरता केओडीए
Reviewed by News1 Marathi
on
July 05, 2019
Rating:
Post a Comment