Header AD

धोनीचं काय चुकलं?


  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

यशाला अनेक नातेवाईक असतात. अपयश मात्र अनाथ असते. म्हणूनच पराभव झाला तर तो कोणाच्यातरी माथी मारून त्याला खलनायक ठरवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. भारत इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर देखील हेच घडले. या पराभवाला महेंद्रसिंग धोनी याला जबाबदार धरुन त्याला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. धोनीच्या संथ खेळीमुळे भारताचा पराभव झाला असे समजून त्याच्यावर टीका करणार्‍यांनी धोनीची संपूर्ण कारकीर्द पाहावी. ज्या खेळाडूने देशासाठी असंख्य सामने जिंकले आहेत, जो या खेळातील चॅम्पियन आहे जो जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर आहे. तीनशेहून अधिक सामने खेळूनही ज्याची सरासरी 50 च्यावर आहे अशा खेळाडूवर टीका करताना टीकाकारांनी तारतम्य बाळगावे. 


धोनीचं काय चुकलं?

धोनी इतके  क्रिकेटचे ज्ञान जगातील कोणत्याच खेळाडूकडे नाही धोनीने जर संथ खेळी केली असेल तर त्यामागे काही कारणे असतील मोठे फटके मारुन विकेट गमावण्यापेक्षा खेळपट्टीवर उभे राहून संघाची धावसंख्या तीनशे पार न्यावी म्हणजे संघाचा नेट रनरेट वाढेल अशीही धोनीची धारणा असू शकते. या पराभवाला धोनीला जबाबदार धरणार्‍यांनी भारताने पहिल्या 10 षटकात केवळ 28 धावा काढल्या होत्या. हे देखील विसरू नये. 338 धावांचा पाठलाग करताना  भारताची सुरुवात संथ झाली होती. हे देखील या पराभवाचे महत्वाचे 
कारण आहे.

-श्याम ठाणेदार
धोनीचं काय चुकलं? धोनीचं काय चुकलं? Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads