Header AD

संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी पाच जणांना अटक

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

दुर्गाडी किल्ल्यासमोर असलेल्या नॅशनल ऊर्दू स्कुलची संरक्षक भिंत मंगळवारी मध्यरात्री घरावर कोसळून यात तीन जणांचा मुत्यू तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणात घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अनधिकृत चाळ तयार करणार्‍या 5 जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. इकलाक मौलवी, अमजद मौलवी, सलमान मौलवी, सलीम मौलवी आणि जावेद मौलवी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सतत सुरू असलेल्या पावासात दुर्गाडी किल्ल्या समोरील नॅशनल ऊर्दू स्कूलची संरक्षक भिंत मध्य रात्री 12.30 वा. सुमारास बाजुच्या घरावर कोसळल्याने तीन जणांचा मुत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये शोभा काबंळे, करीमा हुसेन महंमद, हुसेन चांद हे मृत पावले. तर आरती राजु कर्डीले जखमी झाल्याने तिला उपाचारार्थ रुक्मिणी बाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी पाच जणांना अटक

ज्या घरांवर ही भिंत पडली ती चाळ अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. अनधिकृत चाळ बांधून तेथे ठेवलेल्या भाडेकरूंकडून दरमहा दोन हजार रुपये भाडे घेत होते. तसेच या पावसळ्यात या घराच्या भितींतून पाणी झिरपत असल्याने घराची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भिंती कमकुवत होऊन झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चाळमालकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकांरांना या पाचही आरोपींनी धमकीही दिल्याची माहिती समोर आली आहे.
संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी पाच जणांना अटक संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी पाच जणांना अटक Reviewed by News1 Marathi on July 06, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads