Header AD

पंतप्रधान मोदींची चौकटीबाहेरची विदेशनिती

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर वावरताना मोदींची देहबोली इतकी काही पावरफुल असते, की भारत हा अमेरिका आणि रशिया या दोन जागतिक शक्तीकेंद्रांच्या बरोबरीचाच देश आहे, असा संदेश संपूर्ण जगात परावर्तित होतो. वरून ट्रम्प सोबत मनमुराद भेटताना बाजूला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पुतिन उभे आहेत, याचा मोदींना जराही फरक पडत नाही. तसेच जपानच्या शिंझो अबे यांना गळाभेट देत असलेल्या मोदींसोबत गरमजोशीने हस्तांदोलन करण्यासाठी चीनचे शी जिनपिंग सुद्धा आतुर असतात. मोदींच्या या अद्भुत केमिस्ट्री मागे काय रसायन आहे ते मोदींनाच माहीत. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून यांनी अच्छे दिन आने वाले है असे बोलून ब्रिटनमध्ये मोदींचे केलेले स्वागत असो की, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांचे कितना अच्छा है मोदी असे ट्विट असो, यावरून मोदींनी जागतिक राजकारणात प्रोटोकॉल्स आणि औपचारिकतेला कालबाह्य केले आहे हे दिसून येते. मोदींच्या विदेश दौर्‍यांची खिल्ली उडवून आपल्या मूर्खपणाचे प्रदर्शन करणार्‍या दरबार्‍यांसाठी मोदींची ही विदेशनीती अनाकलनीयच म्हणावी लागेल. इस मोदी को गुजरात के बाहर जानता ही कौन है असं पुरोगांडू गँगद्वारे ज्यांना सतत हिणवण्यात आलं, त्या मोदींना जवळपास डझनभर देशांनी आपल्या देशाचा ‘सर्वोच्च नागरी पुरस्कार’ प्रदान केलाय. 


पंतप्रधान मोदींची चौकटीबाहेरची विदेशनिती

2002 कांडाचे आरोपी मोदींना अमेरिकेत यायला मज्जाव करण्यात यावा असे युपीएच्या 60 खासदारांनी अमेरिकेला पत्र लिहिले होते. पण आज त्याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मोदींसारखा दमदार पंतप्रधान मिळाल्यामुळे भारतीय जनता खरोखर नशीबवान आहे, असे उद्गार काढतात. अक्साई चीन, तिबेट आणि नंतर अरुणाचल सुद्धा चीनला ताटात सजवून देऊ पाहणार्‍या काँग्रेसिंना, मोदींनी चीनला डोकलाम वरून हुसकावून लावले यात काहीही कौतुकास्पद वाटत नाही. 26/11 नंतर भिकेचे कटोरे घेऊन अमेरिकेची याचना करताना काँग्रेसिंना थोडीही लाज वाटली नाही. याउलट पुलवामा हल्ल्यानंतर भारताला घरबसल्या तमाम महासत्तांचे समर्थन घरबसल्या मिळवून हा नवा भारत आज प्रतिहल्ला सुद्धा करू शकतो असा आत्मविश्वास मोदींनी जनतेत निर्माण केलाय. योगाद्वारे भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ ची ओळख जगाला करून देताना ’ए-सॅट वेपन’ आणि सर्जिकल स्ट्राईक्स द्वारे भारताच्या ’हार्ड पॉवर’ ची जाणीव सुद्धा जगाला करून देतात. भारताचे परराष्ट्र धोरण ठरविण्यात विदेशमंत्री आणि विदेश सचिवांची कागदोपत्री जरी प्रमुख भूमिका असली, तरी ते परराष्ट्र धोरण प्रत्यक्षात कणखरपणे मांडण्यात पंतप्रधान मोदींची कोणीही बरोबरी करू शकत नाही. पंतप्रधान मोदी नेहरू प्रमाणे ना एलिट स्ट्राटा मधून येतात, ना ते ऑक्सफोर्डच्या ऍकसेंटने इंग्रजी बोलू शकतात तरीही हे जग या चहावाल्याला इतकं डोक्यावर घेतंच कसं या विचाराने नेहरूवादाच्या हँगओव्हर मधेच झिंगत असलेल्या ल्युटेयन्स पत्रकार आणि डाव्या बुद्धिजीविंना पछाडले आहे. अ र्र्षीीीींश र्डीशिीिेुशी ीर्हेीश्रव षळीीीं लशहर्रींश श्रळज्ञश र र्डीशिीिेुशी या जागतिक राजकारणाच्या उक्तीप्रमाणे भारत ज्याला उद्याची महासत्ता म्हटले जाते, तो आज खरंच एका महासत्तेप्रमाणे वागत आहे. 130 कोटी भारतीयांचा बुलंद आवाज आणि त्यांचे प्रतिनिधित्व मोदी अतिशय तडफदारपणे करत आहेत, यात काहीही शंका नाही. बाकी एका बॉर्न लीडरमध्ये आणि एका लाचार बुजगावण्यामध्ये काय फरक असतो, हे या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे दिसतच आहे. 
पंतप्रधान मोदींची चौकटीबाहेरची विदेशनिती पंतप्रधान मोदींची चौकटीबाहेरची विदेशनिती Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads