कोकणातला काजू पोहोचला मलेशियाच्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात, कृषी उद्योजक आनंद शेट्ये यांचा उपक्रम
मुंबई : मलेशियातील क्वालालांपूर येथे फळे व खाद्यपदार्थांचे २० वे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन नुकतेच भरले होते. या प्रदर्शनास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज एण्ड ऍग्रीकल्चरने निवडक ११६ प्रतिष्ठित उद्योजकांना, कृषीतज्ज्ञांना निमंत्रित केले होते. या उद्योजकांमध्ये काजू उत्पादक व वितरक आनंद शेट्ये आणि त्यांचे चिरंजीव समीरण शेट्ये यांचा समावेश होता.या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये जगभरातील कृषी व कृषीपूरक क्षेत्राशी निगडीत असणारे उद्योजक सहभागी झाले होते. कोकणातील काजूला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, त्यास बाजारपेठ मिळावी या उद्देशाने शेट्ये पिता-पुत्र सुद्धा प्रदर्शनात सहभागी झाले होते. कोकणातील काजू आणि जगभरातील इतर देशातील काजू यांचा तौलनिक अभ्यास यानिमित्ताने त्यांना करता आला. जगभरातील काजूउत्पादक आणि वितरक यांच्यासोबत त्यांनी चर्चा केल्या. यावेळेस आनंद शेट्येंनी सोबत नेलेला कोकणातील काजू येथील उद्योजकांना चाखावयास दिला. ब्राझिल, आफ्रिका आणि व्हिएतनाम येथील काजू जगभरात जातो. मात्र आफ्रिकेनंतर कोकणातील काजू तुलनेत उच्च प्रतीचे असल्याचे मत प्रदर्शनात सहभागी झालेल्या उद्योजकांनी व्यक्त केले. कोकणातील काजूचा ब्रॅण्ड तयार करुन तो जगभरात पोहोचविण्याचा मानस असल्याचे मत कृषीउद्योजक आणि प्रगतशील शेतकरी आनंद शेट्ये यांनी व्यक्त केला.
कोकणातला काजू पोहोचला मलेशियाच्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात, कृषी उद्योजक आनंद शेट्ये यांचा उपक्रम
Reviewed by Maharashtradinman
on
July 04, 2019
Rating:

Post a Comment