Header AD

‘लाईव्ह’ अभ्यासाला पसंती  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

सध्या जे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी ऑफलाइन मोड वापरत आहेत, त्यांच्यापैकी 70% विद्यार्थ्यांना लाईव्ह ऑनलाइन क्लासेसमध्ये प्रवेश मिळाल्यास ते ऑनलाइन शिक्षणाकडे वळतील. यापैकी, 80% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ‘तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन’ हे असे करण्यामागील कारण असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त 90% पेक्षा अधिक सहभागी विद्यार्थ्यांनी आपण ऑफलाइन प्रशिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धती पसंत करू असे सांगितले. घरबसल्या तयारीची सुविधा, लाईव्ह क्लासेसमध्ये प्रवेश आणि ‘खर्चातील लाभ’ हे 3 घटक या निवडीसाठी मुख्यतः जबाबदार आहेत. पुढे, एकूण सहभागी विद्यार्थ्यांपैकी 20% विद्यार्थ्यांनी असे सांगितले की लाईव्ह क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी ते अतिरिक्त पैसे भरण्यासाठी तयार असतील.
ऑनलाइन शिक्षणास प्राधान्य देणार्‍यांपैकी 63% विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी लाईव्ह क्लासेसला पसंती दर्शवली आहे, तर 29% इतक्या कमी विद्यार्थ्यांनी रेकॉर्डेड व्याख्यानांची निवड केली आहे. लाईव्ह क्लासेस निवडण्याची विद्यार्थ्यांनी सांगितलेली प्रमुख कारणे म्हणजे,‘तत्काळ शंका निरसनासाठी परस्पर संवाद’ आणि ‘दर दिवसाच्या अभ्यासाचे योग्य नियोजन’. हे निष्कर्ष स्पष्ट संकेत देत आहेत की, विद्यार्थ्यांना लाईव्ह ऑनलाइन क्लासेसचे अधिकाधिक फायदे जाणवत आहेत आणि आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी तेयात प्रवेश घेण्याचा विचार करत आहेत.

‘लाईव्ह’ अभ्यासाला पसंती

ग्रेडअपचे सहसंस्थापक, शोभित भटनागर म्हणाले, लाईव्ह ऑनलाईन क्लासेसद्वारे अधिक परस्परसंवादी शिक्षणासह, एकूण शिक्षणाचा अनुभव सुधारला आहे, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे सुलभ झाले आहे. शिक्षणाच्या निकलांतही भरपूर सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. ‘ग्रेडअप क्लासरूम - लाईव्ह क्लासेस’सुरू करून, तज्ज्ञ शिक्षक, व्यवस्थित आखलेली अभ्यास योजना आणि तत्काळ विद्यार्थी-शिक्षक संवाद याद्वारे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारी संबंधित त्रुटी कमी करण्यास सक्षम झालो आहोत.’

जेईई, एनईईटी, बँकिंग,गेट,एसएससी इ. सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणार्‍या 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांचे ई मेल, ऑनलाइन सर्वेक्षण, दूरध्वनी आणि वैयक्तिक संवादाद्वारे 3 महिन्यांच्या कालावधीत अहवालाचे सर्वेक्षण करण्यात आले.

‘लाईव्ह’ अभ्यासाला पसंती ‘लाईव्ह’ अभ्यासाला पसंती Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads