निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारांवर कारवाई करा
न्यूज१ मराठी । नेटवर्क
आनंद परांजपे यांचा आंदोलनाचा इशारा
आनंद परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, घोडबंदर परिसरातील सेवा रस्त्यावर जवळपास 30 किमी लांबीचे मल:निस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या वाहिन्या टाकण्यात आल्यानंतर रस्ता सुस्थितीत करण्यात आला होता. मात्र, या भागातील कावेसर, न्यू होरायझन स्कूल, ब्रम्हांड सिग्नल ते आझाद नगर आदी भागातील रस्ते खचले आहेत. पावसाळ्याआधीच केलेला हा रस्ता सुमारे 5 किमी खचला आहे. हे काम इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केले आहे. या कंपनीने हा रस्ता किती निकृष्ट पद्धतीने केला आहे, याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हिजेटीआय अथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे.
निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारांवर कारवाई करा
Reviewed by News1 Marathi
on
July 04, 2019
Rating:

Post a Comment