Header AD

प्रत्येक सजीव हा नग्न अवस्थेत निर्माण झाला आणि होतो.

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

प्रत्येक सजीव हा नग्न अवस्थेत निर्माण झाला आणि होतो. माणूस सोडला तर सर्व कायमस्वरूपी आणि पिढ्यानपिढ्या नग्न राहतात. म्हणजे अगदी अमिबा, झुरळ, पाल, सरडा, आंब्याचे, नारळाचे वडाचे झाड, गवत, गाय, घोडा, वाघ, कबुतर , चिमणी, मासे सर्व. माणूस आजही नग्न जन्माला येतो. पण फक्त माणूस कपडे घालतो.
आदिम काळात गुहा मानव जो गुहाचित्रे काढत होता, लाकडावर लाकूड घासून अग्नी निर्माण करत होता, तो पण नग्न रहात होता. माणसाला वस्त्र आवश्यक वाटले ते लज्जारक्षणासाठी नाही. तर थंडी, उन, पाऊस यापासून संरक्षण मिळावे यासाठी. खरतर अन्य सजिवांप्रमाणे माणसाला पण उन, पाऊस, थंडी यापासून संरक्षण मिळावे म्हणून निसर्गाने प्रतिकारशक्ती दिलेली आहे. उदा. इतर प्राण्याप्रमाणे गुहामानव कच्चे मांस खात व पचवत असे. आज आपण कच्चे मांस किंवा गाजर, उस , कांदा, काकडी , फळे वगैरे काही खाद्य सोडले तर उदा वांगे, गहू, तांदूळ अनेक खाद्य कच्चे खाऊ शकू का? कारण खाद्यसंस्कृतीच्या हजारो पिढ्या मधे आपली पचनसंस्था बदलली आहे. जसे शेपूट गेले तसे. आजही हे बदल होताना स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे आता जी पिढी दहावी मधे आहे त्यांच्या मेंदूचा आकार आपल्या मेंदूपेक्षा मोठा आहे. कारण संगणक क्रांती मुळे मोठ्या मेंदूची गरज निर्माण केली आणि अन्न शिजवून खात असल्याने दाढा, सुळे यांचा आकार कमी होत आहे. त्यामुळे आता अठरा वर्षाच्या मुलांना अक्कलदाढ येण्यासाठी जागाच नसते. कारण मुंडक्याचा मोठा भाग मेंदू आणि लहान भाग जबडा असे होऊ लागले आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर दात पुढे येणे, मग तार बसवणे, अक्कलदाढ येण्यासाठी आँपरेशन्स करणे करावे लागते आहे. हे यासाठी मांडले कारण वस्त्राचेही तसेच आहे. प्राणी पावसात, उन्हात, थंडीत नग्न फिरतात ते आजारी पडत नाहीत, मरत नाहीत असे नाही पण ती संख्या कमी असते. आजारी पडले तरी बरे होतात. पण वस्त्रामुळे आपण उदा थंडी सहन करण्याची आपली नैसर्गिक क्षमता गमावून बसलो आहोत.
हे सर्व यासाठी मांडले कारण हे लक्षात आले पाहिजे की प्रत्येक शोध हा अचानक किंवा  गरजेतून लागला आहे.
म्हणजे फळ खाऊन बी टाकली की झाड उगवते हे माणसाला गरजेतून कळले नाही. तर अनेकदा निरिक्षण करून कळले व तो मुद्दाम बीया जमीनीवर टाकू लागला आणि शेतीचा शोध लागला. म्हणजे शेतीचा शोध गरजेतून नाही तर अचानक लागला. तर काही शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करतात. उदा. कुत्रा चावला की रेबीज होऊ नये म्हणून इंजेक्शन शोधण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले गेले. तसेच वस्त्राचेही आहे. ज्याअर्थी निसर्गाने इतर सजिवांप्रमाणे माणसाला नग्न निर्माण केले आणि संस्कृतीची दहा हजार वर्षे सोडली तर त्या आधीची जवळपास दोन कोटी वर्षे माणूस नग्न राहिला त्याअर्थी वस्त्राची निर्मिती लज्जारक्षणासाठी झालेली नाही.

प्रत्येक सजीव हा नग्न अवस्थेत निर्माण झाला आणि होतो.

लज्जारक्षण ही माणसाची गरज नाही. वस्त्र निर्मिती ही थंडी, पाऊस, उन यांच्यापासून संरक्षण या हेतूने झाली आहे. सुरुवातीला झाडांच्या साली, पाने यांची वल्कले , प्राण्यांच्या कातडी ही वस्त्रे होती. त्यातही थंडीचा विचार करून केसाळ प्राण्यांच्या कातडी किंवा नारळासारख्या मोठी पाने असलेल्या झाडांची पाने वगैरे वस्त्रे यांना प्राधान्य होते. उपलब्ध न झाल्यास नाईलाजाने इतर प्राण्यांची चालवत. अरबस्तानात आजही वाळूच्या दळापासून संरक्षण व्हावे यासाठी डोक्यापासून ते पायापर्यंत वस्त्र परिधान करतात. भारतीय उपखंडात जे वातावरण आहे त्यात धोतर, साडी, लुंगी असे सैल कपडे वापरतात. तर युरोपात प्रंचड थंडी म्हणून टाईट शर्ट, त्यावर कोट, टाय, महिला पण घट्ट कपडे वगैरे वापरतात.पण मानवी संस्कृतीच्या विकासात कुटुंब व विवाह संस्था निर्माण होऊ लागली. नैतिकतेमुळे नाही.सुरूवातीला स्त्रीप्रधान कुटुंब होते. नंतर पुरुष प्रधान झाले.आपण महाभारतात बघतो
द्रौपदीला पाच नवरे होते.कुंतीला नव-याशिवाय इतर म्हणजे सूर्य, इंद्र वगैरे पुरुषांपासून मुले झाली. किंवा युरोपात पण येशू ख्रिस्ताची आई मेरी, मग बाप कोण? कारण या सर्व मात्रुसत्ताक कुटुंब पद्धती होत्या. म्हणून कुंतीचा तेय
राधेचा राधेय इरावतीचा ऐरावत देवकीनंदन अशी नावे आढळतात. परंतु पुरुषप्रधान कुटुंब आल्यावर येशूचा बाप कोण हे महत्त्वाचे ठरले व हे सांगणे कठीण होऊ लागले. तेव्हा मग आकाशातून एक तारा आला. तो देवाचा संदेश होता आणि मेरीला मुलगा झाला तो येशू. असे चमत्कार जोडले गेले. म्हणजे भारतीय इतिहासात एक संवाद आहे. द्रौपदीला पाच नवरे होते वगैरे मुळे नंतरच्या काळात याज्ञवल्क्याने वैशंपायन याला असा प्रश्न विचारला की, असे कसे चालत होते? हे अनैतिक नाही का? तेव्हा वैशंपायनाने उत्तर दिले की, तो त्या काळचा धर्म होता. म्हणजे तुमच्या आजीच्या काळात, आईच्या काळात, तुमच्या काळात आणि तुमच्या मुलांच्या काळात धर्म म्हणजे नियम म्हणजे कायदा म्हणजे संस्कृती म्हणजे नैतिकता बदलत गेली. आता प्रश्न असा आहे की, जर वस्त्र निर्मिती लज्जारक्षणासाठी झाली नाही, द्रौपदीला पाच नवरे करायला, कुंतीला विवाहबाह्य संबंधातून मुले जन्माला घालताना किंवा येशूच्या बापाचा अजूनही पत्ता लागलेला नसताना द्रौपदी, कुंती, मेरी यापैकी कोणालाही हे करताना लाज वाटली नाही व त्या काळातील समाजालाही लाज वाटली नाही, अनैतिक वाटले नाही. मग लज्जा कधी निर्माण झाली? आपण महाभारतात द्रौपदीला द्युतावर लावल्याचे व ती त्याला विरोध करत असा अधिकार युधिष्ठिराला कोणी दिला असे विचारते हे वाचतो. म्हणजे महाभारतात स्रीच्या गुलामीची प्रक्रिया सुरू झाली होती.

रामायणात सीतेचा रावणसोबत शरीरसंबंध आला की नाही हे ठरवण्यासाठी अग्निपरीक्षा होते. म्हणजे रामायण काळात स्त्री गुलाम होती. याज्ञवल्क्याला ज्ञानक्षेत्रात पराभूत केल्यानंतर याज्ञवल्क्याने गार्गीला भर राजसभेत धमकी दिली, यापुढे एक अक्षर बोललीस तरी मुंडके धडावेगळे करीन. गार्गी मान खाली घालून गप्प बसली आणि स्त्री गुलाम झाली. यात गार्गीचा दोष नव्हता तर संपूर्ण राजसभा तिच्या विरोधात होती म्हणून तिला गप्प बसावे लागले. ज्यावेळी पुरुषप्रधान समाज निर्माण झाला त्यावेळी त्या समाजाला अनुकूल असे नियम, धर्म, संस्कृती, कायदे, नैतिकता निर्माण केली गेली. मग मुस्लिम स्रीयांना बुरखा, हिंदू स्त्रीने डोक्यावर पदर वगैरे कल्पना आल्या. गुलामगिरी व सरंजामशाही मधे हे सर्व घडले. आणि मग एखाद्या मुस्लिम स्त्रीने बुरखा किंवा हिंदू स्त्रीने डोक्यावर पदर घेतला नाही तर बाईच्या जातीला हे शोभत का? कुलिन घरातील लेकी सुना पदर घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. वगैरे सुरू झाले. मनु म्हणतो कुमारिकेचे रक्षण बाप करतो. विवाहितेचे नवरा तर व्रूध्देचे पुत्र करतो तर स्त्रीला स्वातंत्र्याची गरजच काय? पण जशी स्त्रीच्या गुलामीची प्रक्रिया झाली तसेच सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी , शाहूमहाराज अशा अनेकांमुळे स्त्रीच्या मुक्तीची व स्त्रीपुरुष समानतेची पण प्रक्रिया सुरू झाली. यामधे संघर्ष होणार हे नक्कीच. सर्व जगात संघर्ष झाले, होत आहेत. यात परत गर्भश्रीमंतांच्या नैतिक कल्पना, ग्रामीण नैतिक कल्पना, मध्यमवर्गीय नैतिक कल्पना हे फरक पडणार. हे असे का होते? केवळ संस्कृती, धर्म एवढेच यामागे नाही. तर प्राचीन काळापासून आजपर्यंत समाज का बदलतो, नैतिकता, नियम कसे ठरतात यामागे अर्थव्यवस्था कारणीभूत असते. त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. एक चांगले पुस्तक आहे. शासनव्यवस्था, खाजगी मालमत्ता आणि कुटुंबसंस्था यांचा उदय आणि विकास.

प्रत्येक सजीव हा नग्न अवस्थेत निर्माण झाला आणि होतो. प्रत्येक सजीव हा नग्न अवस्थेत निर्माण झाला आणि होतो. Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads