Header AD

‘आले शेती’ अमित बनला कोटयधीश


 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

नवीन वर्षात कोरेगाव, सातारा येथील तरुण शेतकरी अमित फडके यांच्या शेतीला आमच्या मित्र-मंडळीसह भेट देण्याचा योग आला. अमित यांची कोरेगाव शहरातच वडिलोपार्जित 12 एकर जमीन आहे. वडिलांचे निधन झाल्याने अमितवर लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी पडली.

दवी शिक्षण त्याला घेता आले नाही. पण त्यांची शेती पाहून तो त्यात मास्टर झाला आहे असेच म्हणावे लागेल. शहरातच शेती असल्यामुळे आजूबाजूच्या शहरीकरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास या शेतीला होत आहे.
सध्या त्याच्याकडे आले, काकडी, झेंडू, फ्लॉवर यांसारखी पिके शेतात आहेत. घराजवळील शेतीत आणि करार शेतीत एकूण 25 एकरावर आले लागवड आहे. सध्याची आले लागवड जून महिन्यातील आहे. साधारणत: 10 महिन्यात पीक तयार होते. 14 महिन्यांपर्यंत ठेवले तर पिकात दिडपट वाढ होते; पण पिकाला मूळकु जीचा धोका राहतो. यापुढे आले 3-4 वर्षाच्या पालटाने लावले जाते. साधारणत: लागवडीच्या वीस पट आले येते. म्हणजे एकरी 1000-1100 बी-बियाणे लागवड केल्यास 20-22 टन आले येते. सध्या अमितला एक गुंठ्यातून 500 किलो आले मिळते. म्हणजे एकरी 20 टन आणि आल्याचा दर 30-35 रुपये किलो आहे. तेव्हा करा हिशोब 25 एकरातून किती पैसे मिळतात ते. अमित यांनी एक एकर सेंद्रिय पद्धतीने आले लागवड केलेली आहे. सेंद्रिय पद्धतीत खर्च कमी येतो. रासायनिक पद्धतीत एकरी तीन लाख रुपये खर्च येतो तर सेंद्रिय पद्धतीत एकरी सव्वालाख रुपये खर्च येतो.
‘आले शेती’ अमित बनला कोटयधीश

आम्ही मित्रांसोबत मागे 5-6 वर्षापूर्वी आले लागवडीचा प्रयोग आपल्याकडे केला होता. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आमच्या मित्रांकडे यांची लागवड केली होती. आपल्याकडे आले कसे होते यासाठीचा हा प्रयोग होता. आणि आपल्याकडेही आले उत्तम आले होते. अगदी लागवडीच्या वीस पट. आपल्याकडील आले आकाराने लहान असले तरी त्याचा स्वाद उत्तम असतो. आमच्या या प्रयोगाच्या वेळी बर्ड फ्लूची साथ असल्यामुळे आम्हाला जेमतेम 10 रु. दर मिळाला होता. त्यामुळे ती शेती पुढे केली नाही. अमित यांच्या शेतात एक एकरवर झेंडूही लावलेला आहे. आतापर्यंत त्याचे दहा तोडे झाले आहेत. आणि त्यांना वीस रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत दरही मिळाला आहे. तसेच त्यांनी हळद लागवडही केलेली आहे. मात्र हळदीवर प्रक्रिया करावी लागते. आणि त्यामुळे त्यांचे दर समाधानकारक नाही, असे त्यांना वाटते. त्यापेक्षा त्यांना फ्लॉवर फायदेशीर वाटतो. 6/71 फुटावर त्यांनी 7500 रोपे लावली आहेत. आणि त्यांना त्यापासून आतापर्यंत 14 टन उत्पादन मिळाले. उसापेक्षाही फ्लॉवरचे अर्थकारण फायदेशीर आहे. तसेच अमित यांनी मल्चीगंवर काकडी लागवडही केली आहे. ही त्यांची काकडी रिलायन्स फ्रेशला जाते आणि त्यांना रोजच्या रोज पैसे मिळतात. अमित यांनी पूर्ण शेतावर ठिबक सिंचन यंत्रणा बसविलेली आहे. ती स्वयंचलित आहे. त्यांच्याकडे भारनियमनामुळे आठ तासच वीज असते. ठिबकमुळे त्यांना पाण्याचे आणि खत व्यवस्थापन उत्तमरित्या करता आलेले आहे. याचबरोबर अमित आपल्या शेतीत जीवामृताचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तसेच त्यांनी आपल्या शेतीत झेंडूसारख्या सापणा पिकाची लागवड केली आहे.

हवामानातील बदलामुळे पीक संरक्षण खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कीटकनाशकांबरोबरच ते कामगंध सापळे आणि चिकट पेपर यांचाही वापर करतात. पिकांमध्ये फेरपालटही महत्त्वाचा असल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे ते एकाच शेतात एकच पीक न घेता फेरपालट करतात. उदा. आले काढून झाले की पपई काढून झाली की कलिंगड नंतर फ्लॉवर त्यानंतर झेंडू यामुळे एखादा रोग, किडे स्थिरावत नाहीत आणि पीक सुरक्षित राहते. हेच त्यांच्या शेतीच्या यशाचे गमक आहे. अमित यांच्या शेतीने एक वेगळी दृष्टी आम्हाला मिळाली. त्याचे अनुकरण आपल्याकडेही शक्य आहे. नवीन वर्षाचा यापेक्षा वेगळा संकल्प काय असू शकेल?
‘आले शेती’ अमित बनला कोटयधीश ‘आले शेती’ अमित बनला कोटयधीश  Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads