Header AD

ठाणे झेडपीत सेना-राष्ट्रवादी सोबत भाजपही सत्तेत

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेने राष्ट्रवादीला हाताशी घेवून झेडपीवर भगवा फडकवला. त्यात सोमवारी चार विषय समितीच्या सभापतींची निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातील महिला व बाल कल्याण समिती सभापती पद भारतीय जनता पार्टीला देवून सत्तेत सामील करून घेतले आहे. विशेष म्हणजे चार पैकी तीन समित्यांच्या सभापती पदावर तीन महिलांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विघ्न उद्भवू नये, भाजप - सेनेत फूट पडू नये, म्हणून सेनेने भाजपाला सभापती पद देवून सत्तेत वाटा दिला असल्याची चार्चा जिल्हा परिषदेच्या आवारात रंगत होती.

  ठाणे झेडपीत सेना-राष्ट्रवादी  सोबत भाजपही सत्तेत

ठाणे जिल्हा परिषदेच्या विभाजनानंतर डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेन 53 पैकी सर्वाधिक 26 जागा मिळवित जिल्हा परिषदेवर भगवा फडकविला. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेवून शिवसेनेने अध्यक्ष बसविला. तसेच जिल्हा परिषदेच्या चार समितींच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत महिला व बाल कल्याण सभापती पदी शिवसेनेच्या दर्शना ठाकरे तर, समाज कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल बरोरा, तसेच बांधकाम समिती सभापती पदी सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे व कृषी समिती सभापती उज्वला गुळवी यांची निवड निवड करण्यात आली होती. त्यात सव्वा वर्षाच्या कालवधीसाठी ह्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे सव्वा वर्षाहून अधिक काळ ह्या सभापतींना मिळावला. त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता 23 मे रोजी संपुष्टात आल्यानंतर शिवसेनेच्या बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे व महिला व बाल कल्याण सभापती दर्शना ठाकरे, राष्ट्रवादीचे समाजकल्याण सभापती निखील बरोरा व कृषी समिती सभापती दर्शना गुळवी यांनी राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती पदासाठी सोमवारी निवडणूका पार पडल्या. यावेळी चारही विषय समिती सभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने या निवडणुका बिनविरोध झाल्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.

बिनविरोध निवड झालेल्या या सभापतीपदी भिवंडी तालुक्यातील कांदळी-पडघा येथील सेनेच्या वैशाली चंदे,यांची बांधकाम व आरोग्य सभापतीपदी निवड झाली. तर भाजपाच्या सपना भाईर ह्या रानाळे येथील असून त्यांची महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीच्या डोळखांब ता. शहापूर येथील संगिता गांगड यांची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती पदी तर भिवंडीच्या अनगांव येथील किशोर जाधव यांची समाजकल्याण सभापती पदी निवड झाली आहे. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून अविनाश शिंदे होते.  
ठाणे झेडपीत सेना-राष्ट्रवादी सोबत भाजपही सत्तेत   ठाणे झेडपीत सेना-राष्ट्रवादी  सोबत भाजपही सत्तेत Reviewed by News1 Marathi on July 09, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads