Header AD

पालिका मुख्यालयावर ‘चिल्लर पार्टी’चा चड्डी बनियन मोर्चा न्यूज१ मराठी । नेटवर्क 

‘चिल्लर पार्टी’ या हिंदी चित्रपटात अनेक लहान बालके सरकारकडे न्याय मागण्यासाठी फक्त चड्डी घालून मोर्चा काढण्याने सरकारला त्याची दाखल घ्यावी लागल्याचे दाखविण्यात आले होते. अगदी अश्याच प्रकारचा अनोखा मोर्चा कल्याण मुख्यालयावर काढण्यात आला. आर.टी.इ अंतर्गत सामाजिक व आर्थिक वंचित घटकास 25 टक्के आरक्षण अतर्गत मोफत प्रवेश व शालेय शैक्षणिक साहित्य पुरवणे बंधनकारक असताना पालिका क्षेत्रातील काही शाळेत हा नियम पाळला जात नाही. राईट टू एज्युकेशनच्या अंमलबजावणी बाबत असणार्‍या अनागोंदीबाबात शिक्षण आरोग्य अधिकार मंचच्या वतीने पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार, आंदोलने मोर्चे काढुन निषेध नोंदवला. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज त्रस्त पालकांनी विद्यार्थ्यांसह पालिका मुख्यालयावर चड्डी-बनियन मोर्चा काढत पालिकेच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. कल्याण- डोंबिवलीतील 81 शाळांचा याआरटीई योजनेत समावेश केला असला तरी बहुतांश शाळांकडून या कायद्याची पायमल्ली होत असून आर. टी. इ अंतर्गत 25 टक्के प्रवेशित मुलांना शिक्षण व शैक्षणिक साहित्य मोफत देणे बंधनकारक असतानाही काही शाळा शैक्षणिक साहित्य मोफत देण्यास असमर्थता दाखवत असून पैशांची मागणी करत आहेत. 

शिक्षण आरोग्य अधिकार मंच ने  कल्याणातील काही प्रसिद्ध शाळांमधील हा कारभार चव्हाटयावर आणला आहे.
गेल्या पाच वर्षापासून या मंचच्या वतीने संबधित शाळांना समज द्या अन्यथा कारवाई करा या मागणीसाठी पाठपुरावा सुरु आहे मात्र पालिका प्रशासनाने या समस्येकडे डोळे झाकपना केला आहे. शाळामध्ये आर. टी. ई अंतर्गत एडमिशन केले जात नाही आणि झालेच तर शालेय शैक्षणिक साहित्य पुरवले जात नाही शाळेच्या इतर एक्टीव्हिटी मधून मुलांना वेगळे काढले जाते पैसे मागितले जातात त्यातून अनकेदा विद्यार्थी विना गणवेश शाळेत जातात त्यामुळे या विद्यार्थ्यांना भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मंचचे अध्यक्ष नितीन धुळे यांनी सांगितले.शिक्षण अधिकारी यांच्या बोट चेपी धोरणाचा तसेच शिक्षण अधिकार्‍यावर मुद्दाम दुर्लक्ष करणार्‍या हेतूचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज कल्याण पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते पालिका मुख्यालयावर चड्डी बनियन मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने आर.टी.ई अंतर्गत विदार्थ्याना मोफत शैक्षणिक साहित्य शालेय गणवेश, शाळेतर्फे राबवण्यात येणारे इतर कोर्सेस क्रीडा कोर्सेससाठी विना शुल्क, शाळांनी आपला प्रवेश स्थर ज्या इयत्तेपासून शाळा सुरु त्या इयत्ते पासून प्रवेश देण्यात यावा, प्रवेश स्थर नोंदवताना शासनाने निर्धारित केलेली पटसंख्या ग्राह्य धरण्यात यावा, आर.टी.इ. अंतर्गत प्रवेशाची नोंद केलेल्या मुलांचा वेगळा वर्ग करू नये, अनुदानित तसेच शासनाच्या शाळामध्ये आर.टी. इ अंतर्गत प्रवेशाची नोंद करण्यात यावी, शासन निर्णय शाळा मान्य करत नसतील मुलांना भेदभावाची वागणूक देत असतील तर त्या शाळेचे रद्द करत फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली.


 याबाबत सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांनी सबंधित शाळांना सोमवार पर्यत कार्यवाही करा अन्यथा सोमवार पर्यंत कारवाई केली नाही तर तत्काळ संबधित शाळांचा नोंदणी परवाना रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येईल अशी नोटीसा काढणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती एड नितीन धुळे यांनी दिली.
पालिका मुख्यालयावर ‘चिल्लर पार्टी’चा चड्डी बनियन मोर्चा पालिका मुख्यालयावर ‘चिल्लर पार्टी’चा चड्डी बनियन मोर्चा Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads