Header AD

धोकादायक जागेत वावरतेय महावितरण

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मांडली विधान परिषदेत लक्षवेधी

इतरांना सुरक्षिततेचे धडे शिकविणार्‍या वीज महावितरण कंपनीचे कल्याण पश्चिमेच्या शिवाजी चौकातील कार्यालय हेच धोकादायक जागेमध्ये असल्यामुळे तेथे कार्यरत कर्मचार्‍यांना तसेच कामानिमित्त जाणार्‍या वीज ग्राहकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात आंबेडकर रोडवरील जमीनदोस्त करण्यात आलेल्या कृष्णा टॉकीजसमोर महावितरण कंपनीचे विभागीय कार्यालय व पॉवर हाऊस आहे. तेथेच महावितरण वीज कंपनीचे 24 तास चालणारे वीज बिल भरणा केंद्रदेखील आहे. त्यामुळे त्यातही सातत्याने वीज ग्राहक व कर्मचार्‍यांची ये-जा असते तसेच शिवाजी चौकात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी 22 केव्हीएचे 4 रोहित्रे असून त्यापैकी 630 केव्हीएचे 2 इनडोअर रोहित्र व 500 केव्हीए व 630 केव्हीएचे प्रत्येकी 1 आउटडोअर रोहित्र आहेत. डिसेंबर 2008 मध्ये 500 केव्हीएच्या रोहित्रास आग लागल्याची घटना घडली होती. महावितरण कंपनीने अध्यादेश काढून भाड्याच्या जागा सोडून स्वतःच्या मालकीच्या जागेत आपले कार्यालय शिफ्ट करण्याचे निश्चित केलेले असतानादेखील महावितरण कंपनीच्या काही हुशार अधिकार्‍यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह ग्राहकांचादेखील जीव टांगणीला लावलेला आहे.

धोकादायक जागेत वावरतेय महावितरण

तसेच विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्रमांक 2 ठाणे यांनी 3 ऑगस्ट 2018 रोजी निरीक्षण केले असता सदर ठिकाणची विद्युत संचमांडणी ही अत्यंत धोकादायक स्थितीत असून तिथे संभाव्य अपघाताचा धोका होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता वर्तवली असून यासंदर्भात कार्यकारी अभियंता कल्याण पश्चिम यांना तात्काळ कार्यवाही कारण्यासंदर्भात कळविले आहे.

यासंदर्भात विधानपरिषद सदस्य जगन्नाथ शिंदे यांनीसुद्धा विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडलेली असून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा ऊर्जामंत्र्यांना पत्र लिहून महावितरणचे पॉवरहाऊस स्थलांतरित करणेबाबत सुयोग्य कार्यवाही करणेबाबत विनंती केली आहे. परिसरातील नागरिक व महावितरणचे कर्मचारी व ग्राहक मात्र ह्या जीवघेण्या कार्यालयातून आपली सुटका होईल का? ह्याकडे चिंतेच्या नजरेने पाहत आहेत.
धोकादायक जागेत वावरतेय महावितरण धोकादायक जागेत वावरतेय महावितरण Reviewed by News1 Marathi on July 09, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads