Header AD

अधिवेशनात लवकर पोहोचण्यासाठी राज्यमंत्र्यांचा लोकलप्रवास, पावसामुळे पावनेतीन तास खोळंबा
कल्याण । डोंबिवली पासून लोकल सुरू झाल्याला 25 वर्ष पूर्ण झाले यानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली स्टेशनवर मिठाई वाटप करत रौप्य महोत्सव साजरा केला. आज सकाळ पासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाने जोर धरला होता.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण अडकले ट्रेनमध्ये

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा आज अधिवेशनात विषय असल्याने त्यांनी मंत्रालयात लवकर पोहोचण्यासाठी 8 वाजता डोंबिवलीहुन लोकल पकडली. मात्र सायन जवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने काही काळ मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका खुद्द राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना बसला. रोज ये जा करणार्‍या प्रवाशांना किती त्रास सहन करावा लागत असेल याचा अनुभव मंत्री महोदयांना आला.

अधिवेशनात लवकर पोहोचण्यासाठी राज्यमंत्र्यांचा लोकलप्रवास, पावसामुळे पावनेतीन तास खोळंबा अधिवेशनात लवकर पोहोचण्यासाठी राज्यमंत्र्यांचा लोकलप्रवास, पावसामुळे पावनेतीन तास खोळंबा Reviewed by Maharashtradinman on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads