Header AD

तेरा दुचाकी लांबवून फायनान्स कंपनीला पाच लाखांचा गंडा

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

थकबाकीदारांच्या खेचून आणलेल्या 13 दुचाकींचा परस्पर व्यवहार करून तब्बल पावणेपाच लाखांचा गंडा रिकव्हरी हेडने घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दीपकसिंग रावत रा.मिरारोड असे त्या भामट्या हेडचे नाव असून त्याने साई पॉइंट फायनान्समधील 13 ग्राहकांची वाहने ताब्यात घेऊन कंपनीला कोणत्याही प्रकारे माहिती न देता परस्पर विक्री केली. याप्रकरणी रिकव्हरी कलेक्शन हेड आणि एजंटला नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली.

साई पॉइंट फायनान्सचे पांचपाखाडी टीएमसीसमोर प्रेस्टिज प्रिसिंट येथील रिकव्हरी कलेक्शन हेड दिपकसिंग रावत रा. मिरारोड याला कंपनीकडून टू व्हीलर वाहनावरील कर्जामधील थकीत वाहने ताब्यात दिले. ते कंपनीचे काल्हेर भिवंडी येथील गोडाऊनमध्ये जमा करून कंपनीस मेलद्वारे माहिती देणे काम सोपविले. रावत व एजंट अजगर सत्तात खान यांनी आपापसात संगनमत करून कंपनीने ग्राहकांना दिलेले टु व्हीलर लोन न भरलेले वरील 13 ग्राहकांची वाहने ताब्यात घेतली. कंपनीला कोणत्याही प्रकारे माहिती न देता सदरचे टु व्हीलर वाहने एजंट मुजीब कुरेशी यांना विक्री करण्यासाठी ताब्यात देऊन त्यांच्याकडून टु व्हीलर वाहने विक्री केल्यावर त्यांचेकडून सुमारे 4 लाख 80 हजार स्विकारून कंपनीचे लोन खात्यामध्ये जमा करणे आवश्यक होते. 

सदरची रक्कम त्यांनी स्वतःचे फायद्यासाठी वापरून कंपनीच्या रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी कंपनीचे क्रेडिट मॅनेजर जयप्रकाश शालिकराम तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दीपकसिंग रावत आणि अजगर खान यान दोघांना नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक करून यांच्याविरोधात शनिवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तेरा दुचाकी लांबवून फायनान्स कंपनीला पाच लाखांचा गंडा तेरा दुचाकी लांबवून फायनान्स कंपनीला पाच लाखांचा गंडा Reviewed by News1 Marathi on July 09, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads