Header AD

लोकसभा पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनाम्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश टावरे यांना भाजपा उमेदवाराकडून दारुण पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भिवंडीतील काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष शोहेब खान गुड्डू यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे.

देशात व राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देताच महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भिवंडीत काँग्रेस पक्षांच्या अंतर्गत गटबाजीमुळे व नगरसेवकांनी निवडणुकीत उमेदवार व अध्यक्षाच्या विरोधात बंड पुकारून असहकार्यची भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाचे शहराध्यक्ष शोहेब खान गुड्डू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भिवंडीतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत काही पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन शहराध्यक्ष शोहेब खान गुड्डू यांचा पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्दा केली आहे.

लोकसभा पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनाम्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी लोकसभा पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनाम्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

रेल्वे मार्गाच्या भूसंपादना साठी लवकरच प्राधिकृत अधिकारी

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ...

Post AD

home ads