ठामपा, वाहतूक शाखेचा रोड सेफ्टी कँपचा समारोप
न्यूज१ मराठी । नेटवर्क
भविष्यातील सुरक्षित ठाणे घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच रस्ते सुरक्षेविषयी जागरुक करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सहयोगाने व होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी रोड सेफ्टी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा यांच्याहस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या मोहिमेचा गुरुवारी समारोप करण्यात आला. या मोहिमेमध्ये वाहतूक पोलीस अधिकारी यांनी 600 हून अधिक विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांविषयी जागरुक करण्यात आले.
यावेळी होंडा स्कुटरचे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी सांगितले, आम्ही वाहतूक उद्योगात असल्याने रस्ते सुरक्षा शिक्षण हा होंडाच्या विचारसरणीचा मूलभूत भाग आहे. रस्त्याचा वापर पूर्णपणे सुरक्षितपणे करण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून समाजातील सर्व स्तरांना रस्ते सुरक्षेविषयी जागृत करत आहोत. बालकांना योग्य वयामध्ये योग्य ज्ञान देणे, हे उद्याच्या सुरक्षित समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या वर्षभरापासून होंडा ठाणे येथील ट्रॅफिक पार्कमध्ये बालकांसाठी रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण देणार्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन हसत-खेळत शिक्षण या पद्धतीने करत आहे. आम्ही आतापर्यंत 17,000 हून अधिक बालकांना त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षेचे दूत बनवले आहे.यंदाच्या उन्हाळी सुटीत, होंडा दोन व्हीलर्स इंडिया या विशेष कॅम्पद्वारे ठाणे महानगरपालिकेच्या सहयोगाने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा संदेश दिला.
ठामपा, वाहतूक शाखेचा रोड सेफ्टी कँपचा समारोप
Reviewed by News1 Marathi
on
July 06, 2019
Rating:
Post a Comment