बोगस डॉक्टरची लबाडी पत्नीकडून उघड
न्यूज१ मराठी । नेटवर्क
11 वर्षांनंतर आपला पती डॉक्टर नसल्याचे समजल्यामुळे एका डॉक्टर पत्नीनेच खुद्द त्या बोगस डॉक्टरविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. संबंधित पेण येथील महेंद्र पाटील नामक डॉक्टरला पनवेल शहर पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्यास 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सूनावली आहे. तसेच पेण येथील या बोगस डॉक्टरची ओळख लपविण्यासाठी त्याला साहाय्य केल्याप्रकरणी त्याचे नातेवाईक व ज्या रुग्णालयात संबंधित बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत होता त्या रुग्णालयाच्या मालकांवर सुद्धा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याने एकच खळबळ माजली आहे.
पनवेलमधील एक उच्चशिक्षित कुटुंबातील डॉक्टर तरुणीचा विवाह पेण तालुक्यातील गडब गावातील एका डॉक्टर तरुणा सोबत 11 वर्षांपूर्वी झाला होता. महेंद्र बामा पाटील असे अटक असलेल्या तरुण डॉक्टरचे नाव आहे. महेंद्र पाटील हा पेण येथील अनेक रुग्णालयात प्रॅक्टिस करत होता. त्यावेळी याच परिसरात संबंधित फिर्यादी तरुणी वैद्यकीय सेवेचे काम करत होती. संबंधित तरुण पेण येथील बड्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवेसाठी काम करत असल्याने संबंधित तरुणीचा व तिच्या घरच्यांचा तो डॉक्टरच असल्यावर विश्वास पटला आणि 2007 साली त्यांचा विवाह देखील झाला. या डॉक्टर जोडप्याला सात वर्षांचे अपत्य देखील आहे.
मात्र कालांतराने त्या बोगस डॉक्टर विरुद्ध अनेक तक्रारी येत असल्याने त्याच्या पत्नीला संशय येऊ लागला त्यावेळी आपले वैद्यकीय शिक्षण कुठे झाले याबद्दल नेहमी वेळ मारून नेण्याची उत्तरे पतीकडून मिळत असल्याने संशय आणखी बळावला. या प्रकरणात अटकेत असलेल्या बोगस डॉक्टर महेंद्र पाटील याने अनेक रुग्णांवर पेण येथील खासगी विविध रुग्णांलयांमधून उपचार केले आहेत.
बोगस डॉक्टरची लबाडी पत्नीकडून उघड
Reviewed by News1 Marathi
on
July 04, 2019
Rating:

Post a Comment