Header AD

देवबाग बंधार्‍याला भगदाड

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

खवळलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नादुरुस्त बनलेला देवबाग बंधारा शुक्रवारी समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. ख्रिश्चनवाडी येथे अनेक ठिकाणी बंधारा वाहून गेला असून समुद्री लाटा थेट वस्तीत घुसत आहेत. येथील घरांना धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.
 लाटांच्या तडाख्यात दोन शौचालय कोसळली असून विद्युत खांबांनाही धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी महसूल प्रशासन तसेच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी संपूर्ण बंधार्‍यांची पाहणी केल्यानंतर पंचनामा करण्यात आला आहे.  दोन आठवड्यापूर्वी वादळी वारा व मुसळधार पाऊस व निर्माण झालेल्या समुद्री वादळ स्थितीमुळे अजस्त्र लाटांच्या मार्‍यात देवबाग किनारपट्टीवरील जीर्ण स्थितीतील बंधारा अनेक ठिकाणी नादुरुस्त बनला होता. यावेळी शासनाच्या वतीने केवळ उपाययोजनांबाबत आश्वासने देण्यात आली. मात्र, कोणतेही ठोस काम झाले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

देवबाग बंधार्‍याला भगदाड

अशा स्थितीत 1993 ते 1995 या दरम्यान बांधण्यात आलेल्या बंधारा ख्रिश्चन वाडी येथे अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. खवळलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटांचे पाणी थेट वस्तीत घुसत आहे. विद्युत खांब वाकून धोकादायक स्थितीत आहेत. येणार्‍या दिवसात आषाढी एकादशी व पौर्णिमेचे समुद्राला धाण असल्याने ग्रामस्थ अधिकच भीतीच्या छायेत आहेत.
 बंधारा वाहून गेल्याची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख जिप सदस्य हरी खोबरेकर, मंडळ अधिकारी आर.व्ही.निपाणीकर, वायरी तलाठी आर. आर. तारी, पोलीस पाटील भानुदास येरागी, ग्रा. प. सदस्य पिंकू फर्नाडिस, शाखा प्रमुख रमेश कदरेकर, उप विभागप्रमुख अनिल केळुसकर,मकरंद चोपडेकर, तमास फर्नाडिस, नादार तुळसकर यांनी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.

देवबाग बंधार्‍याला भगदाड देवबाग बंधार्‍याला भगदाड Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads