Header AD

शिवसेनेचे माजी नगरसेवक एगडे यांचे निधन



 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक राम एगडे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन भाऊ आणि सुना-नातवंडे असा परिवार आहे.ठाणे महापालिकेत 1997 ते 2017 असे चार टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले एगडे दिवंगत आनंद दिघे यांचे खंदे समर्थक होते.ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे,परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी नगरसेवक एगडे यांचे निधन शिवसेनेचे माजी नगरसेवक एगडे यांचे निधन Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads