Header AD

‘न्यूवो कॉन्टूर’चं भारतात पदार्पण

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 


विशीतली तरुणी असो की चाळीशीतली महिला, प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायचं असतं. त्यासाठी मेकअप किंवा ब्यूटी ट्रीटमेंट करणं ओघाने आलंच. याच सौंदर्यप्रसाधनांच्या इण्डस्ट्रीतील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी असलेल्या ‘न्यूवो कॉन्टूर’ने भारतीय बाजारपेठेत पदार्पण केलं. पर्मनंट कॉस्मेटिक्स म्हणजे कायम स्वरुपाच्या सौंदर्यासाठीच्या उपचारपद्धतींमध्ये नवनवीन तंत्रं विकसित करण्यात जगभर ओळखल्या जाणार्‍या ‘न्यूवो कॉन्टूर’चं भारतीय लॉन्चिंग देशातील ब्यूटी इण्डस्ट्रीतील अग्रगण्य सेलिब्रिटी शगुन गुप्ता यांनी सोमवारी केलं.

जगातील मेकअप आणि फॅशन इण्डस्ट्री आमूलाग्र बदलण्यात न्यूवो कंटूरचा मोठा वाटा आहे. पर्मनंट कॉस्मेटिक्सच्या दुनियेत डिजिटल पिगमेंटेशनचं यंत्र सर्वप्रथम आणण्याची कामगिरी ‘न्यूवो कॉन्टूर’नेच केली. मेकअप इण्डस्ट्रीला लागणारी मायक्रो-पिगमेंटेशनची व्यावसायिक उपकरणं, नीडल्स, रंगद्रव्यं आणि प्रशिक्षण यांमधील अतिप्रगत उत्पादनांमुळे ‘न्यूवो कॉन्टूर’चा जगभर विस्तार झाला. आयलॅश आयलाइनर, प्लेन आयलाइनर, लिप मायक्रो पिगमेंटेशन, प्रगत ओम्ब्रे लिप्स, आइसी लिप्स आणि फॅशन पाउडर ब्राउज ही ‘न्यूवो कॉन्टूर’ची जगप्रसिद्ध अशी काही प्रमुख उत्पादनं आहेत.
‘न्यूवो कॉन्टूर’चं भारतात पदार्पण ‘न्यूवो कॉन्टूर’चं भारतात पदार्पण Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२७ रुग्ण तर दोन मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात   आज   २२७    कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून     गेल्या २४ ता...

Post AD

home ads