Header AD

चार अपहृत मुलींचा छडा न्यूज१ मराठी । नेटवर्क 

 नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईच्या हद्दीतून अपहृत मुला मुलींचा तातडीने शोध घेण्याच्या सुचना दिल्याने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने गेल्या पाच सहा महिन्यामध्ये अपहरण झालेल्या गुह्यांचा तपास सुरु केला होता. या तपासात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला शिवम कृष्णा गौड (19) या तरुणाने पळवून नेल्याचे तसेच मुलीला कल्याण मधील पिसवली गाव येथे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिसवली गावातून अल्पवयीन मुलीची सुटका करुन तीला पळवून नेणाऱया शिवम गौडा याला ताब्यात घेतले.  


त्याचप्रमाणे रबाळे एमआयडीसीतील आणखी एका अल्पवयीन मुलीला अजय प्रेमसिंग राज याने पळवून नेऊन तीला औरंगाबाद येथील वाळुंज एमआयडीसी परिसरात ठेवल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याठिकाणावरुन अल्पवयीन मुलीची सुटका करुन तीला पळवून नेणार्‍या अजय राज याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही मुलींना व त्यांना पळवून नेणाऱया तरुणांना पुढील कारवाईसाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. या कारवाईप्रमाणेच नेरुळ परिसरातून अपहरण झालेल्या व कळंबोली भागातून अपहरण झालेल्या दोन मुलींचा देखील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने शोध घेऊन त्यांना संबधित पोलिसांच्या स्वाधिन पेले आहे.
चार अपहृत मुलींचा छडा चार अपहृत मुलींचा छडा Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads