Header AD

अध्ययन अक्षम विद्यार्थी विकास  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

समग्नता (ऑटिझम), अध्ययन अक्षमता आणि वर्तवणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना विविध उपचारपद्धतींद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘चाईल्ड लर्निंग सेंटर’चे डॉ. सुमीत शिंदे यांनी डी. एस. हायस्कूलमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांशी ‘अध्ययन अक्षम विद्यार्थी विकास’ या उपक्रमाबाबत संवाद साधला. अभ्यासात सतत मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठीची शैक्षणिक चेक लिस्ट आणि वर्तवणूकविषयीची चेक लिस्ट देण्यात आली.

अध्ययन अक्षम विद्यार्थी विकास

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुमीत शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील अध्ययन अक्षमता ही लेखन अक्षमता (डिस्ग्राफिया), वाचन-आकलन अक्षमता (डिस्लेक्सिया), अंकगणित अक्षमता (डिस्कॅल्क्युलिया) आणि हालचाल अक्षमता (डिसप्रॅक्सिया) या चार प्रकारची असते. याशिवाय, अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसाऑर्डर असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही, तसंच ते खूपच मस्ती करतात. यांमुळे हे विद्यार्थी अभ्यासात मागे राहतात. मात्र त्यांची ही समस्या वेळीच ओळखता आली आणि त्यावर योग्य उपचार केले गेले, तर अशा विद्यार्थ्यांचाही शैक्षणिक प्रवास सुखकर होऊ शकतो.

अध्ययन अक्षम विद्यार्थी विकास अध्ययन अक्षम विद्यार्थी विकास Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads