Header AD

सज्ज व्हा रेड बुल कार्ट फाइट २०१९साठी


* हौशी गो कार्ट स्पर्धेचे हे तिसरे वर्ष, स्पर्धा सुरू होत आहे १२ जुलैपासून
* खिळवून ठेवणारी अबू धाबी ग्रॅण्ड प्रिक्स बघण्यासाठी यास मारिनाला जाण्याची राष्ट्रीय विजेत्याला संधी

मुंबई । शर्यतीचा अफलातून अनुभव देणारी व अशा प्रकारची एकमेव हौशी गो कार्ट स्पर्धा रेड बुल कार्ट फाइट तिसऱ्या पर्वासह परत येत आहे. भारतातील सर्वांत वेगवान हौशी कार्ट रेसर शोधण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेली ही स्पर्धा १२ जुलै रोजी SMAAASH या लोकप्रिय क्रीडा व मनोरंजन केंद्रात सुरू होत आहे!
रेड बुल कार्ट फाइटचे उद्दिष्ट आहे हौशी स्पर्धक तसेच शर्यतींच्या चाहत्यांना कार्टिंगच्या सकारात्मक अंगाला ‘स्पर्श’ करण्याची संधी देणे तसेच या जोडीने स्पर्धात्मक तरीही गमतीचा अनुभव देणे. आव्हानात्मक यास मारिना सर्किटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या जगातील सर्वोत्तम एफवन ड्रायव्हर्सना प्रत्यक्ष बघण्याची आश्चर्यकारक संधीही यातून दिली जाणार आहे. रेड बुल कार्ट फाइटच्या राष्ट्रीय विजेत्याला २०१९ला अबू धाबी ग्रॅण्ड प्रिक्स २०१९मध्ये यंदाच्या एफवन चॅम्पियनशिपचा थरारक महाअंतिम सामना बघण्यासाठी एक उत्तम ट्रिप पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.
स्मॅश स्कायकार्टिंगच्या सहयोगाने झालेल्या रेड बुल कार्ट फाइटच्या दुसऱ्या पर्वात नवी दिल्लीचा रचित सिंघल ८०० स्पर्धकांमधून सर्वोत्तम ठरला होता. त्यालाही यास मारिना सर्किटमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेली अबू धाबी ग्रॅण्ड प्रिक्स २०१८ची फॉर्म्युला वन चॅम्पियनशिपची अंतिम फेरी बघण्यासाठी एक उत्तम ट्रिप संपूर्णपणे मोफत देण्यात आली होती.
रेड बुल कार्ट फाइट २०१८ राष्ट्रीय अंतिम फेरीतील अनुभवाबद्दल रचित सिंघल म्हणतो, “गेल्या वर्षीच्या रेड बुल कार्ट फाइट राष्ट्रीय अंतिम फेरीदरम्यान मी मिरा एर्डा आणि आणखी एक-दोन ड्रायव्हर्सच्या सतत संपर्कात होतो. माझे ड्रायव्हिंग कसे सुधारता येईल, रेसिंग लाइन्स आणि मला मिळालेल्या वेळातून ते सेकंदाचा दहावा भाग कसा वजा करता येईल यावर चर्चा करत होतो. मी या शर्यतीत आघाडीवर आहे हे मला केवळ प्रेक्षकांजवळून जात असताना ते देत असलेल्या प्रोत्‍साहनामुळे कळत होते. अंतिम शर्यत संपली. मी आनंदाने वेडा झालेलो होतो. मी कार्टमधून बाहेर पडलो. प्रथम एक दीर्घ नि:श्वास टाकला आणि मग माझ्या सगळ्यात जवळ असलेल्या ड्रायव्हरला मिठी मारली. तेथे उपस्थित असलेले सगळेच माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत होते, त्यामुळे मी भारावून गेलो होतो. त्या अंतिम फेरीत मी त्या दिवसाचा सर्वांत जलद लॅप टाइम प्रस्थापित केला आहे आणि ०.२९.८६२ सेंकदांचा सार्वकालिक विक्रम मोडला आहे हे माझ्या मित्राने मला सांगितले तेव्हा या सगळ्या आनंदाचा कळस गाठला गेला.”
अबू धाबी ग्रॅण्ड प्रिक्समधील अनुभवाद्दल रचित सिंघल म्हणाला, “या महाकाय एनर्जी ड्रिंक कंपनीमुळे मला अबू धाबीला जाऊन अबू धाबी ग्रॅण्ड प्रिक्स २०१८ हे या स्पर्धेचे १०वे पर्व प्रत्यक्ष बघण्याची आयुष्यभर विसरता येणार नाही अशी संधी लाभली. अबू धाबी ग्रॅण्ड प्रिक्सची तिकिटे दरवर्षी १०० टक्के का विकली जातात, हे मला तिचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर कळले. दुसऱ्या डीआरएस झोनमधील साउथ ग्रॅण्डस्टॅण्डमध्ये बसून मी ही शर्यत बघितली. डाव्या बाजूने कार्स ३०० किलोमीटर प्रतितास वेगाने  येत होत्या आणि सगळ्या परिसरात ठिणग्या उडत असल्याचा भास होत होता. उजव्या बाजूला ११व्या वळणापूर्वीचा हार्ड ब्रेकिंग झोन होता. तेथून सतत हाय रेव्ह्ज आणि बॅकफायरिंग इंजिनांचे आवाज येत होते. रात्री प्रकाशझोतामध्ये शर्यत बघणे हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी आनंद लुटत होतो फेरारी वर्ल्डमध्ये जगातील सर्वांत वेगवान रोलरकोस्टर फॉर्म्युला रोसाचा. तेथे मी पिएर गास्लीला भेटलो आणि त्याच्याशी चांगली १० मिनिटे गप्पा मारल्या. त्याने मला एक दिवसापूर्वीच्या त्याच्या शर्यतीबद्दलही सांगितले. तो पुढील वर्षी रेड बुलमध्ये उतरणार आहे हेही त्याने सांगितले. तिसऱ्या पर्वातील सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो.”
रेड बुल अॅथलिट तसेच फॉर्म्युला फोर बीएमडब्ल्यूमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय स्त्री  रेसर आणि डब्ल्यू सीरिजमधील पहिल्या ५० रेसर्समध्ये असलेली मीरा एर्डा सांगते, “माझा आणि रेड बुलचा सहयोग उत्तम राहिला आहे आणि आम्हा रेसर्सना जे करायला खूप आवडते, आम्हाला ज्याचे वेड आहे त्यासाठी हा ब्रॅण्ड वाहून घेऊन काम करेल असे मला वाटते. आम्ही रेड बुल कार्ट फाइट ही स्पर्धा सुरू केली याचा मला खूप आनंद वाटतो. हौशी ड्रायव्हर्सना शर्यतीचा आनंदही लुटण्याचे व त्याबरोबरच स्पर्धात्मक अनुभव घेण्याची संधी यातून मिळत आहे. तिसऱ्या पर्वाबाबत मला खूप उत्सुकता आहे आणि स्पर्धक याकडे एक मोठे आव्हान म्हणून बघतील व त्याचवेळी शर्यतीचा थरारही अनुभवतील, अशी आशा मी व्यक्त करते.”
रेड बुल कार्ड फाइट २०१९ची पात्रता फेरी १२ जुलै ते ६ ऑक्टोबर २०१९ या काळात मुंबई आणि दिल्ली येथे होईल. याशिवाय बडोदा, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळूर येथे १६ वर्षांवरील वयोगटासाठी एक दिवसाच्या पात्रता फेऱ्या होतील. राष्ट्रीय अंतिम फेरी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

रेड बुल कार्ट फाइट २०१९

शहरस्तरीय पात्रता फेरी
कालावधी : १२ जुलै ते ६ ऑक्टोबर २०१९ (दररोज)
स्थळ : SMAAASH, लोअर परळ, मुंबई
                : SMAAASH स्कायकार्टिंग, सेक्टर २९, गुरूग्राम

शहरस्तरीय अंतिम फेरी
तारीख : ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१९च्या पहिल्या आठवड्यात
स्थळ : SMAAASH, लोअर परळ, मुंबई
                : SMAAASH स्कायकार्टिंग, सेक्टर २९, गुरूग्राम


एकदिवसीय पात्रता फेरी
कालावधी : ऑक्टोबर (एकदिवसीय पात्रता फेरी)
शहरे               : बडोदा, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू

शहर स्तरावरील पात्रता फेरीतील सर्वांत जलद लॅप टायमिंग्जच्या आधारे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या सुरुवातीला शहरस्तरीय अंतिम फेऱ्या घेतल्या जातील. मागील महिन्यात मुंबई व गुरूग्राम येथील SMAAASH वर झालेल्या अंतिम फेरीतील पहिले २० स्पर्धक महिन्याच्या पहिल्या तीन स्थानांसाठी प्रत्येक शहरांत होणाऱ्या शर्यतीत भाग घेतील. स्पर्धकांना रेसिंगबद्दल वाटणारे प्रेम साजरे करण्यासाठी SMAAASHवरील रोजच्या विजेत्यांना रेड बुल कार्ट फाइट मर्चंडाइज (उत्पादने) देण्यात येतील. राष्ट्रीय अंतिम फेरीत एकूण २२ स्पर्धत भाग घेतील; मुंबई व गुरूग्राममधील तीन महिन्यांत झालेल्या प्रत्येक स्पर्धेमधील पहिले ३ स्पर्धक आणि बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई व बडोदा या शहरांतील पात्रता फेऱ्यांमधील प्रत्येकी एक विजेता अंतिम फेरीत भाग घेतील.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीतील विजेत्याला १ डिसेंबर रोजी होणारी अबू धाबी ग्रॅण्ड प्रिक्स २०१९ बघण्याची संधी मिळेल.
नोंदणी
·      स्पर्धक स्पर्धास्थळावरील प्रणालीमध्ये नोंदणी करू शकतात, यामध्ये त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आणि वेबकॅनद्वारे काढलेले फोटो घेतले जातील.
·       स्पर्धक त्यांचे सोशल मीडिया पेज वापरूनही नोंदणी करू शकतात.
·      ही नोंदणी कार्ट टायमिंग प्रणालीशी थेट लिंक करण्यात येईल.

टायमिंग प्रणाली
·        स्पर्धकाचे नाव १/१००व्या सेकंदापर्यंत अचूक कालावधीसह दिसेल
·        प्रत्येक शर्यतीनंतर लीडर बोर्ड गुणांसह अद्ययावत केला जाईल (दिवसाची व महिन्याची आघाडीची रँकिंग्ज दाखवली जातील) 
सज्ज व्हा रेड बुल कार्ट फाइट २०१९साठी सज्ज व्हा रेड बुल कार्ट फाइट २०१९साठी Reviewed by Maharashtradinman on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads