Header AD

मॉल मधील पार्किंग मोफत करा - रोहिदास मुंडे न्यूज१ मराठी । नेटवर्क 

नागरिक मोठ्या संख्येने आजकाल खरेदीसाठी मॉल मध्ये येत असतात.बाहेर पार्किंग ची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मॉल मध्ये  पार्किंग करावे लागते.खर तर नागरिक मॉल मध्ये खरेदीला येत असल्याने हे पार्किंग मोफत असायला हवे अशी लेखी मागणी दिवा भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी ठामपा आयुक्तांकडे केली आहे.मॉल व्यवस्थापनाकडून नागरिकांना मॉल मध्ये वाहने पार्क करण्यासाठी टोल आकाराला जातो चार्ज घेतला जातो हा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी करत मुंडे यांनी  तसा ठराव पालिका प्रशासनाने करावा असे या पत्रात म्हटले आहे. 

मॉल मधील पार्किंग मोफत करा - रोहिदास मुंडे


जर मॉल बांधला आहे तर त्याठिकाणी पार्किंग ची व्यवस्था करणे मॉल व्यवस्थापन ची जबाबदारी आहे.ठाणे शहरातील मॉल मधील पार्किंग मोफत करण्यात यावे.पुणे मनपा ने याबाबत निर्णय घेतला असून त्या निर्णयाचा  अभ्यास करून  याच निर्णयाच्या धर्तीवर ठाणे शहरातील मॉल चे सर्वेक्षण करून मॉल मधील वाहन पार्किंग मोफत केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मॉल मधील पार्किंग मोफत करा - रोहिदास मुंडे मॉल मधील पार्किंग मोफत करा - रोहिदास मुंडे Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळयात

भिवंडी , प्रतिनिधी  :  लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत घरफोड्याने दोन साथीदारांसह भिवंडी ताल...

Post AD

home ads