Header AD

मोबाईल आणि बॅग चोरणार्‍या सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या न्यूज१ मराठी । नेटवर्क 

बाजारपेठ पोलिसांची कारवाई, 1 लाख 91 हजार 499 चा मुद्देमाल हस्तगत 

मोबाईल आणि बॅग चोरणार्‍या सराईत चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 1 लाख 91 हजार 499 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फैजान शेख असे आरोपीचे नाव असून गुरुवारी एका ट्युशन टीचरची बॅग हिसकावून त्याने पळ काढला होता. कल्याण पश्चिमेकडील टिळक चौकातुन सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त पायी जाणार्‍या ट्युशन टीचर रोहिणी देवडीकर यांची रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग हिसकावून एका दुचाकीस्वाराणे धूम ठोकली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. 

मोबाईल आणि बॅग चोरणार्‍या सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप व सहकार्‍यांनी घटनास्थळा सह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक तरुण ही बॅग घेऊन जात असताना आढळला. मात्र फुटेज अंधुक असल्याने पोलिसांनी आपले कसब पणाला लावत हालचालींची लकब व शरीर यष्टी वरून संशयित आरोपीचा शोध घेत खबर्‍यांने दिलेल्या माहितीच्या आधारे गोविंदवाडी येथे राहणार्‍या फैजान शेख याला अटक केली. पोलिस तपासादरम्यान फैजान कडून आठ गुन्हे उघडकीस आले असून मोबाईल, रोकड, मंगळसूत्र असा 1 लाख 91 हजार 499 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत  करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे व.पो.नि. यशवंत चव्हाण आदीजण उपस्थित होते.
मोबाईल आणि बॅग चोरणार्‍या सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या मोबाईल आणि बॅग चोरणार्‍या सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

प्रकाश आंबेडकरांनी घेतली एनआरसीच्या आंदोलक कामगारांची भेट

■मी आणि माझे कुंटुंब पुरतेच सरकार मर्यादीत   प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   एनआरसी कामगारांची थकीत देणी म...

Post AD

home ads