Header AD

सर्वांगिण विकासासाठी ठा.म.पा. सुरक्षा रक्षकांना यशदाचे प्रशिक्षण न्यूज१ मराठी । नेटवर्क 

सुरक्षा संरक्षकांच्या शारीरिक व व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांनी सुयोग्य आर्थिक नियोजन करून शिस्तबद्ध जीवन जगावे याकरिता महानगरपालिकेच्या सर्व सुरक्षा रक्षकांना यशदा संस्थेच्यावतीने तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कार्मिक विभागाच्यावतीने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे तीन दिवस या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षा विभाग सक्षम बनविण्यासाठी सुरक्षा अधिकारी मच्छिद्र थोरवे यांच्या मागर्दर्शनाखाली कार्मिक विभागाच्यावतीने प्रत्येकी 50 सुरक्षा रक्षकांच्या एकूण 4 बॅचला तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले.यशदा या शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या तज्ञ् प्रशिक्षकांकडून सुरक्षा रक्षकांना शारीरिक व व्यक्तिमत्व विकास, आर्थिक नियोजन, शिस्तबद्धता, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा, वर्तणूक नियम 1971,महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 आदी बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे विभागातील नवीन कर्मचार्‍यांना महाराष्ट्र शासन व ठामपाच्या नियमांची, सेवाशर्ती व कर्तव्यांची माहिती मिळाली असून महापालिकेत आपले कर्तव्य बजावताना या प्रशिक्षणाचा त्यांना फायदा होणार आहे.
सुरक्षा अधिकारी थोरवे यांनी सर्व नवीन कर्मचार्‍यांना सुरक्षा म्हणजे काय, त्याचे प्रकार, सुरक्षतेचे प्रकार, सुरक्षा साधने, त्याचे प्रकार ती वापरण्याची पद्धत तसेच सुरक्षा रक्षकांची कर्तव्य आदी बाबत मार्गदर्शन केले.
ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या उपस्थितीत सदर प्रशिक्षणाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त(2) श्री. उन्हाळे यांनी सुरक्षा विभागाच्या सध्यस्थितीत कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत विभागात अजून सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या. सुरक्षा अधिकारीथोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षकांना त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी वेळोवेळी मागर्दशन करण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्याकरिता महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी पिटी परेडचे आयोजन करण्यात येत असून मार्शल आर्ट तसेच फायर फायटिंगचे देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सर्वांगिण विकासासाठी ठा.म.पा. सुरक्षा रक्षकांना यशदाचे प्रशिक्षण सर्वांगिण विकासासाठी ठा.म.पा. सुरक्षा रक्षकांना यशदाचे प्रशिक्षण Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads