Header AD

कल्याणात जि.प.चे शिक्षक दोन महिने पगाराविना  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे पगार महिन्याच्या एक तारखेला करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र असे असूनही  कल्याण तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील मे व जून महिन्याचे शिक्षकांचे पगारच न दिल्याने या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उच्च शिक्षण न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासनाने वेतन थांबवून न्यायालयाचा अवमान केला आहे. असा आरोप याचिकाकर्ते 109 शिक्षकांनी केला आहे. 

कल्याण तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्या चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे अनेक शिक्षकांना चौथ्या राउंडमध्ये शाळा देण्यात आल्या नव्हत्या. उलटपक्षी ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना बदलीत सोयीच्या शाळा देण्यात आल्या. त्यामुळे अन्यायग्रस्त शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या शिक्षकांच्या बदलीबाबत कोकण आयुक्तांना निर्णय घेण्याचे आदेश देत, 30 मे पर्यंत या शिक्षकांना त्यांच्याच शाळेत कायम ठेवण्याचेही आदेश दिले. या अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पुन्हा बदल्या करण्यासाठी 14 जून रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या समोर समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात आल्या. 


या बदल्यांचे आदेश अद्यापी शिक्षकांना देण्यात आलेले नाहीत. मात्र 29 जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी फक्त कल्याण तालुक्यातील 109 शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे एकीकडे चुकीच्या बदलीचा मनस्ताप आणि दुसरीकडे दोन महिन्याचे वेतन नाही यामुळे शिक्षकांनी जगायचे कसे असा आर्त सवाल संजय टेभे या याचिकाकर्ते शिक्षकांनी केला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे पालघर जिल्ह्यातील बदली होऊन आलेल्या 97 शिक्षकांना तीन महिने पगार नाही, आणि शाळांवर नियुक्त्याही नाहीत.
कल्याणात जि.प.चे शिक्षक दोन महिने पगाराविना कल्याणात जि.प.चे शिक्षक दोन महिने पगाराविना Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२७ रुग्ण तर दोन मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात   आज   २२७    कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून     गेल्या २४ ता...

Post AD

home ads