आदिवासी जमीन हस्तांतरण प्रकरणी अनुसूचित आयोगाने बजावली नोटीस
न्यूज१ मराठी । नेटवर्क
तालुक्यातील कांबा वाघेरेपाडा येथील आदिवासी शेतकर्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची शेकडो एकर शेतजमीन उल्हासनगर येथील बिल्डर प्रकाश बुधराणी व इतरांनी बोगस शेतकरी दखला सादर करून हडप केली असल्याने त्याविरोधात परहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांनी आवाज उठवून आदिवासीची जमीन त्यांना परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई दिली.
त्यांनी अगदी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार ते जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मंत्री महोदय, राज्यपाल, पंतप्रधान ते अगदीच राष्ट्रपतीपर्यंत तक्रार केली. परंतु त्यांना अपेक्षित न्याय न मिळाल्याने अखेर हे प्रकरण राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे दाखल केले. आयोगाने या प्रकरणाची गंभिरता लक्षात घेवून राज्याचे पोलीस महासंचालक, महसूल विभागाचे सचिव, राज्यस्थान सिरोहीचे जिल्हाधिकारी यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना आयोगाने समन्स बजावल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
आदिवासी जमीन हस्तांतरण प्रकरणी अनुसूचित आयोगाने बजावली नोटीस
Reviewed by News1 Marathi
on
July 05, 2019
Rating:

Post a Comment