Header AD

आजीबाईंचे क्रिकेट वेड
  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

पहिला वर्ल्डकप खेळवला जायच्या 43 वर्षं आधी चारुलता यांचा जन्म झालाय. त्यांनी क्रिकेटर्सच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत, पण विराट त्यांना सर्वोत्तम वाटतो. त्या फॅन ऑफ द टूर्नामेंट आहेत.

क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात भलेभले वेडे होतात. आपला मुळ खेळ जरी क्रिकेट नसला तरी ब्रिटिश राजवटीच्या 150 वर्षाच्या काळामुळे क्रिकेट हाच खेळ आपल्याला वाटायला लागलाय. नुसते आपणच वेडे नाहीत तर जिथे जिथे ब्रिटिशांची राजवट होती त्या त्या ठिकाणी क्रिकेटचे वेड पसरलय. जन्मापासून क्रिकेट खेळाचे झालेले संस्कारच याला कारणीभूत आहेत. बर हे वेड इतक आहे की अगदी कळायला लागलेल्या बाळापासून ते थेट आजीबाईंपर्यत या खेळाचे वेड डोक्यात भिनलेले आहे. बांग्लादेशवर विजय मिळवत मंगळवारी विराट कोहलीची भारतीय टीम वर्ल्ड कप 2019च्या सेमी फायनलमध्ये दाखल झाली. आणि विराटने हा विजय साजरा केला त्याच्या एका सुपर फॅनसोबत. या फॅनचं वय - फक्त 87 वर्षं. नाव - चारुलता पटेल. विजय मिळवून टीम मैदानातून बाहेर पडत असताना विराट कोहली आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला रोहित शर्मा थेट गेले चारुलता पटेल यांना भेटायला. स्टॅण्ड्समधून भारतीय टीमला पिपाणी वाजवत चिअर अप करणार्‍या या आजी कॅमेर्‍यावर झळकल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झाल्या. पहिला वर्ल्डकप खेळवला जायच्या 43 वर्षं आधी चारुलता यांचा जन्म झालाय. त्यांनी क्रिकेटर्सच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत, पण विराट त्यांना सर्वोत्तम वाटतो. त्या फॅन ऑफ द टूर्नामेंट आहेत. टीम इंडियाला जोशामध्ये प्रोत्साहन देणार्‍या चारुलतांचा फोटो पाहत इंग्लेंडचा माजी कॅप्टन मायकल वॉघनने म्हटलं की हा ’वर्ल्ड कप मधला सर्वोत्तम फोटो’ आहे. मी टीमच्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो. विशेषतः चारुलताजींचे. त्या 87 वर्षांच्या आहेत आणि मी पाहिलेल्या फॅन्सपैकी सर्वात उत्साही आहेत. वय हा फक्त आकडा असतो. पण एखाद्या गोष्टी विषयची वेड तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातं. त्यांचे आशीवार्द घेऊन आता पुढच्या मॅचेस खेळू, असेे जेव्हा विराट कोहली म्हणतो तेव्हा या वयातही आजीबाईंच क्रिकेट वरील भक्तीला तो सलाम असतो. 

आजीबाईंचे  क्रिकेट वेड

चारूलता आजी कॅमेर्‍यावर दिसताच सर्वत्र त्यांचीच चर्चा होऊ लागली. आयसीसीची टीमही त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेली. मुलाखतीतल आजींनी सांगितलं की त्यांचा जन्म भारतात नव्हे तर टांझानियामध्ये झाला आहे. त्यांनी आपली क्रिकेटची आवड आणि क्रिकेटच्या प्रेमाबाबत माहिती दिली. त्यांची मुलं काऊंटी क्रिकेट खेळतात. त्यांना पाहूनच आजी क्रिकेटप्रेमी बनल्या आहेत. आजींचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताला पाठिंबा देण्यासाठी त्या आल्या होत्या.भारत यावेळी विश्वचषक नक्की जिंकेल, असा विश्वास असल्याचं चारूलता यांनी सांगितलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आजी म्हणाल्या की भारताच्या विजयासाठी त्या गणपतीची प्रार्थना करतील. 1983 मध्ये जेव्हा भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता, त्यावेळीही चारूलता आजी इंग्लंडमध्येच होत्या असं त्यांनी सांगितलं. क्रिकेट त्यांना खूप आवडतं, मात्र नोकरी करत असताना त्या केवळ टीव्हीवर मॅच पाहायच्या. मात्र निवृत्तीनंतर आता जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा त्या सामना पाहण्यासाठी स्टेडियमला आवर्जून जातात.

क्रिकेट आज सर्वांच्याच नसानसात भिनलाय. लाखो कोटी डॉलर्सचे व्यवहार यावर अवलंबून आहेत. जगातला सर्वात मोठा उद्योग म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळेच आता आपलाही मुलगा क्रिकेटर व्हावा म्हणून आईवडील देव पाण्यात घालून बसलेले दिसतात. मुलाच मैदानी खेळाचे किंवा इतर खेळांचे वय फक्त आणि फक्त क्रिकेटच्या जगाभोवतीच फिरु लागले आहेत.  क्रिकेट ही नशा नाही तर जगण्याचे स्वप्न झाले आहे. ही स्थिती स्वागतार्ह नक्कीच नाही. पण भांडवली व्यवस्थेत खेळाडूंचा जिथे बाजार भरतो तिथे खेळ ही विक्रीची वस्तु झाल्यावर आणखीन काय होणार?  तरीही आजीबाईंच्या क्रिकेट वेडाचे स्वागत करुया!


आजीबाईंचे क्रिकेट वेड आजीबाईंचे  क्रिकेट वेड Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads