'शिवसेना-भाजप खाते, म्हणून मुंबई नाल्यात जाते'
मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी तुंबण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. 'शिवसेना आणि भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून दरवर्षी मुंबई पाण्यात जाते', अशा शब्दात आव्हाड यांनी शिवसेना आणि भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.
मुंबई
ताजी प्रतिक्रिया
जितुभाई, तुमचे गाॅडफादर शरद पवार हे किती तरी दशके सत्तेत होते तरी शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी का नाही लागला? अजुनही हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ते पाप तुमच्या पक्षाचे आहे...+
मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी तुंबण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. 'शिवसेना आणि भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून दरवर्षी मुंबई पाण्यात जाते', अशा शब्दांत आव्हाड यांनी शिवसेना आणि भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.
नालेसफाईच्या कामासाठी आधी टेंडर काढावे लागते. त्यानंतर हे काम मे महिन्यापर्यंत संपवावे लागते. मात्र, हे काम मे महिन्याच्या अखेरीस सुरू केलं जातं आणि जूनच्या सुरुवातीला अर्धवटच सोडून दिलं जातं. वर्षानुवर्षे तेच कंत्राटदार असतात, असं म्हणत आव्हाड यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत असून त्याचा परिणाम रेल्वे आणि रस्तेवाहतुकीवर झाला आहे. मुंबईत सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईतील अनेक वस्त्याही पाण्याखाली गेल्या आहेत. सखल भागातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने न झाल्याने मुंबईची ही स्थिती असल्याचे म्हणत याला शिवसेना आणि भाजप जबाबदार असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.
'शिवसेना-भाजप खाते, म्हणून मुंबई नाल्यात जाते'
Reviewed by News1 Marathi
on
July 01, 2019
Rating:
Post a Comment