Header AD

योग आणि मेंटल मॉडेल

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

गात भव्यदिव्य काहीही नाही. स्ट्रेचिंग व फिसीओथेरपी मधील हॅपी हार्मोन्स तयार करणारा एक बाळबोध व्यायाम आहे. शेताला एक फेरफटका मारला तर त्या पेक्षा जास्त फायदा होतो. तो एक व्हाइट कॉलर सुखवस्तूंचे गेट टू गेदरचे कर्मकांड आहे. योग हे कृषी संस्कृतीतील श्रमाला तुच्छ लेखणारे /घृणा निर्माण करणारे आहे.
 खेडेगावात मजूर मिळत नाहीत, तरुणांना मातीत हात घालायला कमीपणा वाटतोय. उच्चवर्णीयांचे अनुकरण करण्याच्या प्रक्रियेला ब्राह्मणायझेशन /संस्कृतायझेशन म्हणतात. आम्ही तमाम शूद्र त्या प्रक्रियेमागे आहोत तर ’ते’ पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात ! चीन मी पाहिला. अभ्यासला. आपल्या नन्तर 2 वर्षांनी स्वतंत्र झालेला, किडे मकुडे खाणारा देश कुठे गेलाय ! त्यांनी एक केलं. सांस्कृतिक क्रांती केली. जुने फेकून दिले. जुनाटाना अद्दल घडविली. नवे विचार, नव्या कल्पना राबवल्या. इस्रायलने तेच केलं. इथं, उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरणार्‍या महिला, घरी कर्मकांड करीत बसलेल्या असतात. बाहेर जय श्रीराम किंवा नारे तकदिर अल्ला ओ अकबर म्हणत एकमेकांकडे त्वेषाने पाहणारे पुरुष  व त्या महिला हातात टिकाव व फावडे घेऊन  बाहेर पडले तर योगासन व नमाजापेक्षा जास्त आनन्द मिळेल. हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार असा कि, निवृत्तीनन्तर मी सहा एकर शेताला 10 महिने पुरेल एव्हडा पाणी पुरविण्याचा हार्वेस्टिंग चा प्रयोग केलाय. नोकरीत असताना एस आर पी गृप पुणे, पुणे ग्रामीण जिल्हा, सातारा अकोला..... या ठिकाणी पोलीस स्टेशन, पोलीस लाईन , परिसरात आम्ही श्रमदानातून बागा फुलवल्या.

योग आणि मेंटल मॉडेल

 पोलिसांना मातीत हात घालायला लावून मोर्चा घेऊन येणार्‍या कष्टकर्‍यांच्या दुःखाची जाणीव करून दिली. श्रम करताना व्यायाम होतो। गळणार्‍या घामातून आनन्द मिळतो.  लावलेलं रोपटं मोठं होत असताना नवं निर्मितीचा आनन्द मिळतो हे दाखवून दिलं. एकत्रित काम करताना संघ भावना कशी वाढते हे पहाता आले. पर्यावरण रक्षणास मदत करता येते, बाग काम करणे हा तणाव कमी करण्याचा रामबाण उपाय आहे हे पोलीस दलाला दाखवून दिले. म्हणून तर इंग्रजी साहेब स्टेजवर अगर दुसर्‍याच्या बागेत तंगड्या वेड्या वाकड्या करत, कृत्रिम हसत बसण्याऐवजी बागेत काम करताना दिसतो. गांधीजी म्हणत नवं निर्मिती करणारा शेतकरी हा जगातला आनंदी माणूस असेल. मोदीजी व फडणवीस यांच्या दुत्वात श्रम करणाराना शूद्राचा दर्जा असून त्याने उच्च वर्णीयांची सेवा करावी, असा आदेश आहे तर योग हे सत्वगुणी ब्राह्मण वर्णीयांसाठी आहेत. म्हणूनच टीनोपालने धुतलेले कपडे घालून फडणवीस स्टेजवर योगनृत्य करताना  तर त्यांचे कुटुंबीय झुंबा नृत्य करताना दिसतील. आमच्या गावाकडील भावा-बहिणींनी त्यांचे अनुकरण करून भागणार नाही व आनंद ही मिळणार नाही. कुदळ फावडे घेऊन त्यांना गावाभोवतालचे पाणी अडवून जिरवता येईल. परिसर फुल, फळ, औषधी झाडे लावून सुंदर स्वच्छ करता येईल. आधी केले मग सांगितले या उक्ती नुसार मला फडणवीसांच्या नौटंकीतली नकारात्मकता  सांगण्याचा अधिकार आहे. योगाचा संबंध सनातनी विचार ते वर्ण व्यवस्था ते विषमता ते शोषण ते पूर्व जन्मीचे कर्म ते अवतार ते ... मोक्ष !  म्हणून योग, यज्ञ ही फडणवीस व मंडळी सोडल्यास इतरासाठी अधोगतीकडे नेणारी समाजाची  ’मेंटल मॉडेल्स ’आहेत.
योग आणि मेंटल मॉडेल योग आणि मेंटल मॉडेल Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads