Header AD

ऋषिकेशच्या आजूबाजूची ठिकाणं न्यूज१ मराठी । नेटवर्क 

र्यटकांनी त्रिवेणी घाट जवळ ऋषिकुण्ड ला एकदा तरी भेट नक्की द्यावी. हा एक छोटासा तलाव आहे. प्राचीन रधुनाथ मंदिर सुद्धा इथे आहे. विशिष्ट गुहा हे सुद्धा  ऋषिकेश मधील प्रमुख आकर्षण आहे. हे एक ध्यान केंन्द आणि साहसी खेळासाठी प्रसिद्ध  आहे. या जागी कॅम्प मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाते. एक प्रसिद्ध ध्यान केंद्र श्री स्वामी पुरुषोत्तमानणंद याचे आश्रम या गुहेजवळ आहे.

ऋषिकेशच्या आजूबाजूची ठिकाणं
या व्यतिरिक्त श्री बाबा विशूदानंद च्या द्वारे स्थापन केलेले काली कमलीवाले पंचायती क्षेत्र  हे एक मुख्य आकर्षण आहे. याचे मुख्यालय ऋषिकेश मध्ये आहे.. याच्या शाखा गढवाल मध्ये पसरलेले आहे. पर्यटकाना राहण्यासाठी इथे आश्रम आहे. ऋषिकेश मध्ये अजून एक आश्रम आहे, जो स्वामी शिवानंद ने स्थापन केले आहे. हे आश्रम हिमालयाच्या गंगा नदीजवळ आहे. सन 1947 मध्ये स्थापित ओंकारनंद आश्रम सुद्धा पाहू शकतात. या आश्रमाद्वारे शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. ऋषिकेश पासून 16 किमी अंतरावर शिवपुरी मंदिर आहे. भगवान शंकरला समर्पित मंदिर आहे. व हे मंदिर गंगा नदी किनारी आहे. नीलकंठ महादेव मंदिर, गीता भवन, त्रिवेणी घाट, स्वर्ग आश्रम ऋषिकेश मधील महत्वपूर्ण असे स्थळे आहेत. तीर्थक्षेत्रा व्यतिरिक्त इथे साहसी खेळासाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहेत. चुकी शहर डोंगराळ भागात वसलेले आहे, हे ठिकाण ट्रेकिंग साठी प्रसिद्ध आहे. गढवाल हिमालय क्षेत्र, बुवांनी निरगुड, रुपकुंड, कौरी दर्‍या, कालिन्दी थाल, कनकुल थाल आणि  देवी राष्ट्रीय पार्क आहेत. फेबुवारी ते ऑक्टोबर हा काळ ट्रेकिंगसाठी उत्तम काळ आहे.
ऋषिकेशच्या आजूबाजूची ठिकाणं


मंदिरे  - 
 नीलकंठ मंदिर
 भरत मंदिर
 शत्रुघ मंदिर
 त्रंबकेश्वर मंदिर
 लक्षुमन मंदिर
 कुंजादेवी मंदिर
 रघुनाथ मंदिर
 वीरभद्र मंदिर इत्यादी
घाट-पूल-कुंड -
लक्षुमन झुला
 त्रिवेणी घाट
 ऋषी कुंड
गीता भवन
 वशिष्ठ गुहा इत्यादी
योग / आश्रम 
मुनी ची रेती
 परमार्थ शिवानंद आश्रम
 ओमकारणंद आश्रम
 स्वर्गाश्रम
 बीटल्स आश्रम
 आनंद प्रकाश आश्रम
 आंध्र आश्रम
 हिमालयन योग्य आश्रम
 मधुबन आश्रम
 निर्मल आश्रम
 फूल चट्टी आश्रम
 ओशो गंगा धाम आश्रम
 साधक ग्राम आश्रम
 स्वामी दयानंद आश्रम
 वानप्रस्थ आश्रम  इत्यादी


ऋषिकेशला कसे जावे - ऋषिकेश सर्वात जवळचे विमानतळ डेहराडूनमधील जॉ ली ग्रांट विमानतळ आहे. ऋषिकेशला जाण्यासाठी हरिद्वार, डेहराडून, दिल्ली वरून बसेस आहेत. ऋषिकेशच्या जवळचे स्टेशन हरिद्वार आहे.
ऋषिकेशच्या आजूबाजूची ठिकाणं ऋषिकेशच्या आजूबाजूची ठिकाणं Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads