शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी...
न्यूज१ मराठी । नेटवर्क
पहिल्याच वर्षाच्या निकालांवरून हे ही सिद्ध झाले आहे की, डीआयबी कार्यक्रमात सहभागी झालेल्या शाळांपैकी 40 टक्के शाळांनी विद्यार्थासाठीची शैक्षणिक प्रगतीची उद्दिष्टे गाठली आहेत, किंवा त्याच्या पलिकडे मजल मारत ह्या उपक्रमात सहभागी नसलेल्या शाळांना मागे टाकले आहे. ह्या उपक्रमाच्या एका वर्षातील शैक्षणिक प्रगतीच्या आधारावर, त्यात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदरांची जोखीम दूर झाली आहे कारण डीआयबीच्या एकूण कालावधीच्या सरासरीपेक्षा हा निकाल अधिक आला आहे.
डीआयबी च्या प्रशासक मंडळाच्या प्रमुख सुकाणू समितीमध्ये ब्रिटीश एशियन ट्रस्ट, द मिशेल अंड सुझान डेल फाऊंडेशन, युबीएस ओप्तीमास फाऊंडेशन आणि टाटा ट्रस्ट ह्या सगळ्यांचा समावेश असून, ‘कॉमिक रिलीफ’ ही स्वयंसेवी संस्था, ब्रिटीश सरकारचा आंतरराष्ट्रीय विकास विभाग (ऊऋखऊ),मित्तल फाऊंडेशन, बीटी आणि लॉरेन्स एलिसन फाऊंडेशन यांचाही यात सहभाग आहे. ‘ग्रे मैटर्स इंडिया (ॠचख).’ या स्वायत्त संस्थेने एका वर्षातील निकालांचे तटस्थ मूल्यांकन केले आहे. एक वर्ष हा उपक्रम राबवल्यानंतर त्याच्या परिणामांचे मूल्यांकन केल्यावर सर्वांनी मिळून, फारशी चांगली कामगिरी ना करणारा एक उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. ह्यात निकालही समाधानकारक नव्हता शिवाय प्रकल्प राबवण्यात अनेक आव्हाने होती. सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संस्था (डअठऊ) आता केवळ काही थेट उपचारात्मक शैक्षणिक कार्यक्रम राबवणार आहे, अप्रत्यक्ष शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आता थांबवला जाणार आहे. मात्र, आता माइंड स्पार्क हा नवा कर्यक्रम जोडल्यामुळे डीआयबी एकूण चार प्रकल्प सुरू ठेवणार आहे. माईंड स्पार्क हर विद्यार्थ्यांमधील कौशल्ये वाढवणारे ऑनलाइन शैक्षणिक साधन आहे. यूबीएस ऑप्टिमास फाऊंडेशन अशी कल्याणकारी सामाजिक कामेदेखील इतर कामांप्रमाणेच समान व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून करतो, जेणेकरून, आमच्या क्लायंटनी दिलेल्या निधीचा योग्य विनियोग होऊन त्याचे परतावे त्याना मिळतील, अशी खात्री पटेल. निधी घेतलेल्या उपक्रमाच्या अंमलबजावणी कसे आम्ही बारीक लक्ष देतो. आम्ही जवळून परीक्षण करतो, आम्ही नियमितपणे गृहितकांना आव्हान देतो आणिनिधी देणार्यांना आम्ही हे सर्व काम दाखवतो. म्हणूनच आम्ही आमच्या विशेष कामगिरी न करणार्या प्रकल्पाला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे , असे, यूबीएस ऑप्टिमास फाऊंडेशनच्या सीईओ फेलिस कोस्टान्झा यांनी सांगितले .
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी...
Reviewed by News1 Marathi
on
July 05, 2019
Rating:

Post a Comment