न्यायालयात शिवीगाळ करून आरोपीने फेकली न्यायाधीशांवर चप्पल
न्यूज१ मराठी । नेटवर्क
ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिवान असलेला गायकवाड याला शुक्रवारी दुपारी न्यायाधीश गुप्ता यांच्या न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणी दरम्यान,न्यायाधीशांनी आरोपी गायकवाड याला ,तुमचा वकील आला आहे का ? अशी विचारणा केली.तेव्हा,त्याने न्यायाधीश गुप्ता यांना तुम्हीच मला वकील दिला आहे. तो येतच नाही असे प्रत्युत्तर दिले. त्यावर न्यायमूर्तीनी,तुला दुसरा वकील देतो, पुढच्या तारखेस खटला चालवु असे सांगितले. न्यायाधीशांच्या या वक्तव्याने संतापलेल्या गायकवाड याने न्यायालयातच शिवीगाळी करून आपल्या पायातील चप्पल काढून थेट न्यायाधीश गुप्ता यांच्यावर फेकली.त्यानंतर न्यायालयातील पोलिसांनी गायकवाड याला ताब्यात घेऊन न्यायालया बाहेर नेले. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयात शिवीगाळ करून आरोपीने फेकली न्यायाधीशांवर चप्पल
Reviewed by News1 Marathi
on
July 01, 2019
Rating:

Post a Comment