Header AD

ठाण्यात नळांना गढूळ पाणी न्यूज१ मराठी । नेटवर्क 

एकीकडे पावसाला जोरदार सुरुवात झाली असून दुसरीकडे शहरातल्या काही भागात गढूळ पाणी यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नळाला येणार्‍या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. पावसामुळे माती मिश्रित पिवळसर पाणी ठाणेकरांना नाईलाजाने प्यावे लागत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ठाणेकरांना पिवळे पाणी पिण्याची वेळ आली आहे. 

 ठाण्यात नळांना गढूळ पाणी
ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर परिसरातील घरातील नळाला पिवळसर पाणी येऊ लागले आहे, सततच्या पडणार्‍या पावसामुळे नळाला पिवळसर पाणी प्राशन करावे लागत आहे. गेली अनेक वर्षे पावसाळ्यात असेच पाणी येत असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. दरम्यान महापालिकेच्या दुर्लक्षित पणाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शहरात विकास कामाचा धडाका सुरू असला तरी पाणी समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात शहरात येणार्‍या गढूळ पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पोटदुखी, काविळ, चक्कर येणे यासारखी आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. 


नौपाडा, पाचपाखडी, वागळे तसेच घोडबंदर सारख्या भागात अनेक ठिकाणी गढूळ पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहेत. हे पाणी जलशुद्धीकरण न करता थेट नळावाटे नागरिकांच्या घरात येते, गेली कित्येक वर्षे पावसाळ्यात गढूळ, पिवळसर पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मागील वर्षी तर नळामधून चक्क मासे येत असल्याची तक्रार नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती. तर काही नागरिकांना उलट्या, ताप अशा आजारांना सामोरे जावे लागले होते. दरम्यान तात्पुरत्या नळ दुरुस्तीसह इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी कायम स्वरुपी पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासनाकडून त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 
ठाण्यात नळांना गढूळ पाणी  ठाण्यात नळांना गढूळ पाणी Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads