Header AD

गरिबाने किड्यामुंग्यांसारखं मरायचं !  न्यूज१ मराठी । नेटवर्क 


बिल्डर, महानगर पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि पोलीस यांचे पैसाधारित अनैतिक संबंधातूनच, कष्ट करून जगणार्‍या निष्पापांचे जीव गेले, हेच त्रिवार सत्य.

बिल्डरांच्या जीवावर राजकारण करणारे राजकारणीसुद्धा तितकेच जबाबदार. धनकवडीत पाच पाच, सात सात मजली बेकायदा बांधकाम करणारा व्यक्ती मंत्री होतो. यापेक्षा अधिक किळसवाणं उदाहरण काय असेल. ज्या विधी मंडळामध्ये बांधकामाबाबत कायदे झाले, ते कायदे फाट्यावर मारून बेकायदा बांधकाम करणारा मंत्री, आता त्याच विधिमंडळात बसून सत्याच्या घोड्यावर स्वार होऊन महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणार, ही विधिमंडळाची थट्टा आहे. मंडळी मनपा अधिकारी बांधकाम आराखडा मंजूर करतात तेव्हा पैशाच्या तालावर नाचत मंजुर्‍या दिल्या जातात. विविध छजउ या केवळ पैशाच्या वजनावर तोलल्या जातात. हे सगळं होतं, घर खरेदी करणार्‍या भाबड्या खरेदीदारांच्या पैशांवर, तुम्ही/आम्ही  घर घ्यायचं आणि आख्खं तारुण्य/जवानी ते कर्ज फेडण्यात घालवायचं.  आपल्याला पैशांचा पूर्ण मोबदला मिळाला नाही तरी, विद्रोह करता येत नाही. आवाज उठवला तरी ऐकायला कोणी नाही. न्याय मागायचा कुठे. पोलिसांकडे तक्रार घेऊन जावं तर बिल्डरविरुद्ध असलेल्या तक्रारीची आधी चौकशी करण्याच्या नावावर गुन्हा नोंद करण्यास नकार देणारे पोलीस कोणत्या प्रशिक्षणात शिकून आले असतील असा प्रश्न पडतो. 

गरिबाने किड्यामुंग्यांसारखं मरायचं !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये मोका अंतर्गत गुन्ह्याचा तपास जवळपास 2 वर्ष सुरू आहे. मध्यंतरी आंबेगाव येथील एका प्रकल्पातील सदनिका धारकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केलाय जवळपास 2 महिने झाले गुन्हा नोंद केला नाही. कोंढवा पोलीस स्टेशनमधील अधिकारी बिल्डर विरोधात गुन्हा नोंद करण्याचा स्पष्ट नकार देतो एवढंच काय लेखी दिलं जातं की तुमची बाब दिवाणी स्वरूपाची आहे, दिवाणी न्यायालयात जा! दोन महिन्यापूर्वी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये एका 65 वर्षाच्या खरेदीदाराने गुन्हा नोंद करण्यासाठी अर्ज केला आहे. बिल्डरला 43 लाख दिले तरी बिल्डरने अद्याप खरेदीखत नोंद करून दिले नाही. पोलीस गुन्हा नोंद करायला तयार नाहीत. देहूरोड पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन हे सगळेच एका वर्गात शिकलेले, खादाड पोलीस अधिकारी! जेव्हा एक खझड निवृत्त होतो, तेंव्हा तो 1 हजार कोटींचा मालक असतो, जेंव्हा एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्त होतो तेंव्हा तो 100 कोटींचा मालक असतो, इतके पैसे अधिकारांचा गैरवापर केल्यामुळेच कमवता येतात.  काही अपवाद आहेत. परंतु उघडंं नागडं सत्य आहे. राज्यकर्ते आणि शासकीय अधिकारी यांना पैसाच इतकं भयानक व्यसन आहे, त्यांची मूल बाळ अशीच मेली तरी हे दुष्टचक्र सुरूच ठेवतील. आता अधिवेशन सुरु आहे, कदाचित विरोधक विधानभवनात स्वच्छ गालिचा टाकलेल्या पायर्‍यांवर आंदोलन करतील. तुम्ही पुढील 6 महिन्यात सगळं विसरून जाल, पुन्हा एखाद माळीण होईल. पुन्हा 5 लाख मदत दिली जाईल. गरिबाने किड्यामुंग्या सारखं मरायचं! हे असं चालायचंच !!आहे त्यात सुख मनायला शिकवणार्‍या माझ्या आईबापाचा ऋणी आहे. मला पैशाचं व्यसन नाही!
गरिबाने किड्यामुंग्यांसारखं मरायचं ! गरिबाने किड्यामुंग्यांसारखं मरायचं ! Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads