Header AD

प्लास्टिक बंदीबाबत कडक कारवाई सुरू होणार न्यूज१ मराठी । नेटवर्क 

सभापती विश्वदीप पवार यांचे आश्वासन

महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र समितीची सभा महत्वाची असून स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविता येतात. प्रभाग क समितीच्या सभेत प्लास्टिकवरील कारवाई आणि नालेसफाई विषय घेण्यात येणार आहे. या सभेत सचिव, उपायुक्त, प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे. प्रभाग समितीच्या सभेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणी पालिका अधिकार्‍यांमध्ये समन्वय हवा. समितीच्या सभेत जे विषय येतात ते विषय पुढे जाऊन महासभेच्या पटलावर येत असतात. त्यामुळे दर महिन्याला प्रभाग समितीची सभा पार पाडण्यात येईल असे पदभार स्विकारताना सभापती विश्वदीप पवार यांनी सांगितले.
प्लास्टिक बंदीबाबत कडक कारवाई सुरू होणार


भाजप नगरसेवक विश्वदीप पवार यांनी प्रभाग समिती सभापती पदाचा पदभार स्विकारला. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राहुल दामले यासह भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सभापती पवार यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांना स्वायवॉकवरील फेरीवाल्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच स्टेशनबाहेरील परिसरातील ज्या दुकानदारांनी फुटपाथ अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावरही कारवाई करावी असे निर्देश दिले. तर मुख्यआरोग्य निरीक्षक यांना वसंत देगलूरकर फ प्रभाग क्षेत्रअंतर्गत असलेल्या प्रभागातील कचरा वेळेवर उचलण्यात यावा असे निर्देश दिले. प्लास्टिक कारवाई संदर्भात बोलताना सभापती म्हणाले, पालिका हद्दीत 100 टक्के कारवाई झाली असे म्हणता येणार नाही. मात्र कडक कारवाई झाली पाहिजे. समितीच्या पहिल्या सभेत सर्व विषयांना प्राधान्य देण्यात येईल. संबंधित विषयाबाबत एखादा अधिकारी जाणीव उपस्थित राहिला नाही तर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे यासंदर्भात सदर अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी करू असेही सभापती पवार यांनी सांगितले.

प्लास्टिक बंदीबाबत कडक कारवाई सुरू होणार प्लास्टिक बंदीबाबत कडक कारवाई सुरू होणार  Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

रेल्वे मार्गाच्या भूसंपादना साठी लवकरच प्राधिकृत अधिकारी

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ...

Post AD

home ads