Header AD

ठाणे स्थानकाला वर्ल्ड क्लास स्थानकाचा दर्जा द्या  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

खासदार राजन विचारे यांची लोकसभेत मागणी

संसदेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी देशातील 1253 रेल्वे स्थानकांचा आदर्श स्टेशन योजनेतून विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे का? असा प्रश्न खासदार राजन विचारे यांनी लोकसभेत विचारला. तसेच ठाणे रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास स्टेशनचा दर्जा द्यावा अशी जोरदार मागणी खासदार राजन विचारे यांनी केली. 

ठाणे स्थानकाला वर्ल्ड क्लास स्थानकाचा दर्जा द्यात्याचबरोबर ठाणे हे ऐतिहासिक असे रेल्वे स्थानक आहे की या स्थानकातून 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली होती. याला 164 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ठाणे रेल्वे स्थानकात दिवसाला आठ लाख प्रवासी रोज ये-जा करीत आहेत. त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानक हे दिवसाला 50 लाखाचे उत्पन्न मिळवून देणारे मध्य रेल्वेवरील मुंबई सोडून एकमेव रेल्वे स्थानक आहे. अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर रेल्वे राज्यमंत्री सुरेश चन्ना बसप्पा अंगडी यांनी ठाणे रेल्वे स्थानकाची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत असे उत्तर दिले. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास स्थानकाचा दर्जा देणार का? अशा विचारलेल्या दुसर्‍या प्रश्नावर उत्तर देताना या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाला इंटरनॅशनल लेवलचे स्थानक करण्यात येणार आहे. असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री सुरेश चन्ना बसप्पा अंगडी यांनी खासदार राजन विचारे यांना सभागृहात दिले.

ठाणे स्थानकाला वर्ल्ड क्लास स्थानकाचा दर्जा द्या ठाणे स्थानकाला वर्ल्ड क्लास स्थानकाचा दर्जा द्या Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads