Header AD

जपानी पद्धतीने झाडे लावण्याचे प्रशिक्षण

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

पावसाळ्यामध्ये शासनाच्या वतीने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत प्रत्येकजण आपापल्या परीने सहभागी होत असतो. या मोहिमेत सहभागी होत असतानाच भारतीय मजदूर संघ -ठाणे जिल्ह्याच्या पर्यावरण मंचाच्या वतीने डोंबिवली येथे कोकेदामा बॉल बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोकेदामा ही झाडे लावण्याची एक जपानी पद्धती आहे. 


जपानी पद्धतीने झाडे लावण्याचे प्रशिक्षण

यामध्ये मातीविरहित तसेच कुंडीचा वापर न करता झाडे लावली जातात. कोकोपीट, खत आणि शैवाल याच्या सहाय्याने रोपे लावली जातात व त्याला सुतळीने गुंडाळून घेतले जाते  ही रचना बॉल प्रमाणे दिसते. सदरच्या पद्धतीमध्ये घराच्या आत ठेवता येतील अशी सूर्यप्रकाश कमी लागणार्‍या झाडांचा समावेश केला जातो, हे बॉल्स वजनाला अत्यंत हलके असून ते घराच्या दर्शनी भागात टेबलावर ठेवू शकतो. दोरीने ते टांगून ठेवता येतात.

जपानी पद्धतीने झाडे लावण्याचे प्रशिक्षण जपानी पद्धतीने झाडे लावण्याचे प्रशिक्षण Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads