समाजसेवक मेधा पाटकर रविवारी ठाण्यात
न्यूज१ मराठी । नेटवर्क
या वर्षी एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ पुरस्कार देऊन नाही तर दहावीच्या वर्षातच त्यांना अभ्यासपूरक सर्वांगिण मदत मिळेल आणि भविष्यात सक्षम एकलव्य घडेल या भूमिकेतून संस्थेने ठाण्यातील निवडक महापालिका माध्यमिक शाळांमध्ये ‘एकलव्य सक्षमीकरण योजना’ महापालिकेच्या मदतीने सुरू केली आहे. या योजनेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मेधा पाटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्रमिक जनता संघ या युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत याच दिवशी ठाण्यात टाऊन हॉल येथे दुपारी दोन वाजता कामगार आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युनियनचे उपाध्यक्ष संजीव साने या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असतील. घंटागाडी कामगार, रस्ते सफाईसाठी महापालिकेने ठेवलेले कंत्राटी कामगार, पाणी खात्यातील कंत्राटी कामगार आदी विविध क्षेत्रातील कामगार आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन युनियनचे चिटणीस जगदीश खैरालिया यांनी केले आहे.
समाजसेवक मेधा पाटकर रविवारी ठाण्यात
Reviewed by News1 Marathi
on
July 05, 2019
Rating:

Post a Comment