Header AD

महापालिकेची यंत्रणा संततधार पावसात रस्त्यावर न्यूज१ मराठी । नेटवर्क 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणार्‍या संततधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली असून गेल्या 24 तासांत प्राप्त झालेल्या छोट्या-मोठ्या तब्बल 51 तक्रारींचा निपटारा महापालिकेच्या अग्नीशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), आपत्ती व्यवस्थान कक्ष यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. दरम्यान पावसाचा जोर लक्षात घेवून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकार्‍यांनी दक्ष राहण्याच्या कडक सूचना देतानाच नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यात हयगय करू नये असे आदेश दिले आहेत.

महापालिकेची यंत्रणा संततधार पावसात रस्त्यावर

गेल्या 24 तासात ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणांहून जवळपास 51 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी झाड अथवा झाडाच्या फांद्या पडण्याच्या होत्या. त्या सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेवून अग्नीशमन दल, उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचार्‍यांनी या सर्व तक्रारींचा निपटारा केला. त्याचबरोबर 4 ठिकाणांहून आगीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले. त्याचबरोबर पाणी साचण्याच्या, भिंत पडण्याच्या तसेच  शॉर्ट सर्किटच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी सोडविण्यासाठी अग्नीशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), आपत्ती व्यवस्थापन कक्षांबरोबरच घनकचरा, मलःनिसारण, विद्युत विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी त्या त्या ठिकाणी कार्यरत् होते. दरम्यान, पावसाचा जोर लक्षात घेवून अधिका-यांनी अलर्ट राहावे तसेच कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत.
महापालिकेची यंत्रणा संततधार पावसात रस्त्यावर महापालिकेची यंत्रणा संततधार पावसात रस्त्यावर Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads