Header AD

मुंबईतील नाल्यालगतच्या 4 मजली झोपड्या हटवणार

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

महापालिकेनेही 5 लाख रुपये द्यावेत तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्यसरकार 5 लाख रुपये देणार असून महापालिकेनेही त्यांना 5 लाख रुपये द्यावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला केल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त लोकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईतील नाल्यालगतच्या 4 मजली झोपड्या हटवणार

‘अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई होणार’


 मुंबईतील नाल्यांवर तसेच मिठी नदीसारख्या नद्यांवर अतिक्रमण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले. त्याचप्रमाणे मुंबईतील नाल्यांचे, नद्यांचे काही ठिकाणी प्रवाह बदलण्यात आले असून असे प्रवाह बदलणार्‍यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत नेमका कुठे, कसा आणि किती पाऊस झाला याची माहिती शासनाकडे असून, मुंबईत नेमके कुठे-कुठे पाणी साचते याचा अभ्यास करून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत मुसळधार पावसानंतर तुंबणार्‍या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून नाल्याच्या रुंदीकरण हाती घेण्यात येणार असून, नाल्यांजवळील 4 मजली झोपडपट्ट्या हटवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. कडक भूमिका घेऊन ही कारवाई करण्यात येणार असून झोपड्या काढण्याला विरोध करणार्‍यावर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. या झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या लोकांचे स्थलांतर करण्यात येणार असून, स्थलांतराला विरोध करणार्‍यांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.


मुंबईतील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या स्थितीवरून मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटून गदारोळ झाला. त्यानंतर झालेल्या चर्चेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना झोपड्या हटवण्याचा कार्यक्रम जाहीर केला. मुंबईतील नाल्यांवर तसेच नद्यांच्या परिसरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर झाली असून, पाणी साचण्याच्या दृष्टीने मुंबईतील हीच मोठी समस्या असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


मुंबईतील नाल्यालगतच्या 4 मजली झोपड्या हटवणार मुंबईतील नाल्यालगतच्या 4 मजली झोपड्या हटवणार Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads