Header AD

मुसळधार पावसातही 27 गावे आठवडाभरापासून कोरडी

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

सर्वत्र धो धो पाऊस पडत असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या औद्योगिक विभाग व ग्रामीण भागात मात्र पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. औद्योगिक पाणी पुरवठा मंडळाच्या जांभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या पाणी पुरवठा करणार्‍या वाहिनीमध्ये कचरा अडकल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. त्याची सफाई करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होत असताना नागरिक मात्र टँकरसाठी धावपळ करत होते.मुसळधार पावसातही 27 गावे आठवडाभरापासून कोरडी
मुसळधार पावसातही 27 गावे आठवडाभरापासून कोरडी

औद्योगिक विभाग, निवासी भाग व 27 गावात औद्योगिक विकास मंडळ पाणी पुरवठा करते. मात्र 27 तारखेपासून या सर्व भागाला अचानक पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होऊ लागला. यामुळे मध्यंतरी सुरळीत झालेला पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. 27 तारखेपासून 2 तारखेपर्यंत नागरिकांना पाणी अत्यंत कमी दाबाने होत असल्याने पाण्यावाचून हाल झाले. ग्रामीण भागातील अनेक निवासी संकुले ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन बांधण्यात आली आहेत. ही निवासी संकुले पाणी बिले भरत नसल्याची तक्रार आहे. आयुक्त बोडके यांनी पाण्याचे भरलेले बिल दाखवा व टँकर 400 रुपयांत न्या असे जाहीर केल्याने मोफत पाणी घेणार्‍यांची मोठी पंचायत झाली आहे. पालिकेचे अधिकारी व औद्योगिक विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे. तर शिवसेनेचे प्रकाश म्हात्रे यांनी आठवडाभर नागरिकांना पाण्यावाचून रहावे लागल्याने येत्या शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला, तो ठेवू नये अशी मागणी त्यांनी औद्योगिक पाणी पुरवठा मंडळाकडे केली आहे.

मुसळधार पावसातही 27 गावे आठवडाभरापासून कोरडी मुसळधार पावसातही 27 गावे आठवडाभरापासून कोरडी Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads