Header AD

मालाडमध्ये भिंत कोसळून 19 जण ठार 75 जखमी  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 19 जण ठार झाले असून 75 जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. 

मालाडमध्ये भिंत कोसळून 19 जण ठार 75 जखमी

अनेकजण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. एक महिला तिच्या बाळासह ढिगार्‍याखाली असल्याचे आढळून आले आहे. तिला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
मालाडमध्ये भिंत कोसळून 19 जण ठार 75 जखमी मालाडमध्ये भिंत कोसळून 19 जण ठार 75 जखमी Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads