Header AD

टॉप 10 महाविद्यालयांमध्ये कल्याणचे एसएसटी कॉलेज सातवे


  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

क्रीडा विभागाची गुरू नानक देव जनरल चॅम्पियन्स स्पर्धा,  ठाणे विभागात दुसरा क्रमांक

नव्याने सुरू करण्यात आलेल्या शूटिंग आणि योगा या खेळात सुद्धा खेळाडूंनी आपली छाप सोडली. एकुण पुरूष सांघिक संघाने 120 आणि महिला सांघिक संघाने 240 आणि पुरूष वैयक्तिक प्रकारात 25 आणि महिला वैयक्तिक प्रकारात 15 असे एकुण 400 गुण पटकावले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. सी. पुरस्वानी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाचे क्रीडा संचालक राहूल अकुल, पुष्कर पवार, क्रीडा प्रशिक्षक संदेश चव्हाण, श्रीकांत शेलार, दिपक खरात यांनी उत्तम मेहनत घेतली तसेच महाविद्यालयाचे उप प्राचार्य भारती पुरस्वानी क्रीडा विभाग प्रमुख तुषार वाकसे, सचिन वायले,  प्रा. संतोष करमानी, यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

मुंबई विद्यापीठातर्फे 2018-19 वर्षाची क्रीडा विभागाची गुरू नानक देव जनरल चॅम्पियन्स टॉप टेन महाविद्यालयाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात मुंबई विद्यापीठातील सुमारे 700 महाविद्यालयापैकी एस एस टी महाविद्यालयाने सातवा क्रमांक पटकावला तर ठाणे विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे.  
एस.एस.टी. महाविद्यालयाने क्रॉस कंट्री, अ‍ॅथलेटिक्स, अर्ध मॅरेथॉन, वेट लिफ्टिंग, कुस्ती, तायक्वांदो, बॉल बॅडमिंटन, योगा, रायफल शूटिंग, ज्यूडो इ. खेळांमध्ये खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. यामध्ये क्रॉस कंट्रीस्पर्धत पुरूष आणि महिला दोन्ही संघाने वैयक्तिक पातळीवर सुवर्ण पदक जिंकले तसेच संघाने पण सुवर्ण पदक पटकावले. तसेच अ‍ॅथलेटीक खेळात ब्रामजी कांगा या नावाने दिला जाणारी महिलांची चॅम्पियनशिप ट्रॉफी सुद्धा महिलांनी पटकावली आणि पुरूष संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच वेटलिफ्टींग या खेळात महिलांमध्ये वैयक्तिक पातळीवर सुवर्णसह द्वितीय क्रमांकाची चॅम्पियनशिप पटकावली तसेच तायक्वांडो, ज्युडो, क्रॉसकंट्री, अ‍ॅथलेटीक्स यात सुवर्ण, रजत आणि कास्य पदकांची कमाई केली.

टॉप 10 महाविद्यालयांमध्ये कल्याणचे एसएसटी कॉलेज सातवे टॉप 10 महाविद्यालयांमध्ये कल्याणचे एसएसटी कॉलेज सातवे Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads