Header AD

डोंबिवली लोकल सेवेचा 1 जुलै रोजी रौप्यमहोत्सव न्यूज१ मराठी । नेटवर्क 

डोंबिवली रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीचे, उत्पन्नाचे रेल्वे स्थानक म्हणून प्रसिध्द आहे. या शहराची लोकवस्ती जशी वाढू लागली तशी डोंबिवलीहून रेल्वे लोकल सेाडण्याच्या मागणीने वेग घेतला. यासाठी नागरिकांनी रेल्वे रोको, सत्याग्रह, उपेाषण आदि मार्गांचा अवलंब करुन जनआंदोलने केली. यामुळे तत्कालीन केंद्र शासनाला दखल घ्यावी लागली व डोंबिवली लोकल सुुरु करण्याची मागणी पूर्ण करण्यात आली. यासाठी डोंबिवली टर्मिनस उभारण्यात आले. 1 जुलै 1994 साली डोंबिवली ते सी.एस.टी पहिली लोकल सुरु करण्यात आली त्याला येत्या 1 जुलै रोजी 25 वर्षे होत असून यानिमित्त डोंबिवली स्थानकावर अनौपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी  7-15 वाजता डोंबिवली लोकल सीएसटीकडे रवाना होणार्‍या लोकलमधील प्रवाशांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावार विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. 

डोंबिवलीत 1960 साली प्रवासी संघटना स्थापन झाली. या संस्थेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व तत्कालीन खासदार कै. रामभाऊ म्हाळगी व कै. खा. राम कापसे यांनी केद्राकडे पाठपुरावा केला.राम कापसे युतीचे खासदार असताना त्याचे हस्ते डोंबिवली लोकलचा शुभारंभ करण्यात आला. डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटण्यात येणार असून पश्चिमेच्या दिशेला डोंबिवलीचे वैशिष्ट दाखवणारे प्रसंग चितारले जाणार आहेत.आता जरी डोंबिवली लोकल सुरु झाल्या असल्या तरी या लोकल गर्दीच्या वेळेत व अधिक सोडण्यात याव्यात, महिलांसाठी विशेष  लोकल डोंबिवलीहून सेाडण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे स्थानकावर अनेक सुविधा केल्या असल्या तरी आणखी सुविधांसाठी ते प्रयत्नशील आहेत.
डोंबिवली लोकल सेवेचा 1 जुलै रोजी रौप्यमहोत्सव डोंबिवली लोकल सेवेचा 1 जुलै रोजी रौप्यमहोत्सव Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads