विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांचे केडीएमसीवर धडक
न्यूज१ मराठी । नेटवर्क
याबाबत पालक विनोद तिवारी यांनी शाळा प्रशासनाने पुस्तकाची सक्ती न करण्याची मागणी मान्य केली आहे. मात्र काही पालक ग्रुप बनवून मनमानी करत आंदोलने करत असून शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना घाबरवत असल्यामुळे शाळेत भीतीचे वातावरण पसरले आहे. या आंदोलनामुळे शाळा तीन दिवस बंद असून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाने पोलीस आणि शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करावा मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये अशी मागणी केली आहे. दरम्यान शाळा प्रशासन आणि पालकांच्या वादात विद्यार्थी वर्ग मात्र नाहक भरडला जात असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने या प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढवा अशी मागणी केली जात आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांचे केडीएमसीवर धडक
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:
Post a Comment