Header AD

कल्याण-डोंबिवलीतील स्मार्ट सिटीचे भविष्य अधांतरीच

मोठा गाजावाजा, भूमिपूजन झालेल्या सिटीपार्कच्या जागेचा तिढा अद्यापी सुटलेला नसल्यामुळे या जागेवर प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. तर वाडेघर सापाड भागात 298  हेक्टर परिसरात नगर रचना परियोजना राबविणे अपेक्षित असून प्रत्यक्षात या जागा देखील अद्यापी ताब्यात आलेल्या नाहीत. प्रत्यक्षात नागरिकांना पालिका प्रशासनावर विश्वास नसल्यामुळे आपल्या जागा देण्यास नागरिकांचा विरोध असला तरी आयुक्तांकडून मात्र या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध नसल्याचा दावा आयुक्तांकडून केला जात आहे.

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

वारंवार निविदा काढूनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने कल्याण शहरातील स्मार्ट सिटीचे भविष्य अधांतरीच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत कल्याण डोंबिवली महापालिकेचा समावेश चार वर्षांपूर्वी करण्यात आला असून 2023 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील स्मार्ट सिटीचे भविष्य अधांतरीच

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक प्रकल्प स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून प्रस्तावित करण्यात आले असून आतापर्यंत 891 कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. वारंवार काढल्या जाणार्‍या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काम सुरू होऊ शकले नसल्याची कबुली प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे मागील 4 वर्षांपासून केवळ कागदोपत्री असलेली स्मार्ट सिटी प्रत्यक्षात केव्हा येणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून 1549 कोटी रुपयाचे विविध प्रकल्प राबविण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. शहराच्या विकासासाठी 24 प्रकल्प राबविण्याची तयारी 25 जून 2016 पासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू आहे. यात 10 पॅन सिटी आणि 8 कन्व्हरजन्स प्रोजेक्टसह एरिया बेस डेव्हलपमेंट प्रकल्पाचा समावेश आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, काळा तलावाचा विकास, सिटी पार्क, टाऊन शिप, रस्त्याचे जाळे तयार करणे आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

स्टेशन परिसराचा विकास या प्रकल्पाला या योजनेत प्राधान्य देत यासाठी डीपीआर तयार करत निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र 520 कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी दोन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकल्पाला ठेकेदाराच मिळत नसल्यामुळे हे काम चार वर्षांत निविदेच्या गर्तेत अडकले आहे. 
कल्याण-डोंबिवलीतील स्मार्ट सिटीचे भविष्य अधांतरीच कल्याण-डोंबिवलीतील स्मार्ट सिटीचे भविष्य अधांतरीच Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२७ रुग्ण तर दोन मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात   आज   २२७    कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून     गेल्या २४ ता...

Post AD

home ads