ट्रक दुचाकी अपघातात एक ठार दोन जखमी
न्यूज१ मराठी । नेटवर्क
मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत पुलानजीक भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यात उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला पाठीमागून धडकून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, दुचाकीवर बसलेले त्याचे दोघे सहकारी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.प्रीतम प्रकाश पराड (25) रा.मुंब्रा असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून सचिन खोत (21) रा.काटेमानिवली,कल्याण आणि अभय जाधव (19) रा.मुंब्रा अशी जखमींची नावे आहेत.
दोघाही जखमींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु असून हे तिघेही जण ठाण्याहून मुंब्य्राच्या दिशेने घरी निघाले होते.तेव्हा,रस्त्यात उभ्या करण्यात आलेल्या ट्रकचा अंदाज दुचाकीस्वाराला न आल्याने हा अपघात घडला.याप्रकरणी,कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.
ट्रक दुचाकी अपघातात एक ठार दोन जखमी
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment